गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहर

चिखली परिसरातील इंडस्ट्रीयल परिसरामध्ये चो-या करणारी टोळी चिखली पोलीसांकडुन जेरबंद

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १० एप्रिल २०२४ चिखली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गणेशनगर, सोनवणेवस्ती, रामदासनगर, चिखली या भागामध्ये अनेक लहानमोठे उद्योगधंदे असुन ब-याच वर्कशॉपमध्ये गाडयांचे पार्ट तयार करण्याचे काम केले जाते. दि. ०४/०४/२०२४ रोजी २३.०० वा. ते दिनांक ०५/०४/२०२४ रोजी सकाळी ०७.१५ वाजताचे सुमारास प्रविण इंडस्ट्रीज गट नं ११७७ गणेश नगर चिखली पुणे या कंपनीमधुन अज्ञात चोरटयांनी १,७५,५००/- रुपये किंमतीचे गाडयांचे सुट्टे पार्ट तयार करण्याकरीता लागणा-या लोखंडी डायमिटरचा मुद्देमाल चोरुन नेला होता. सदरबाबत कंपनीचे मालक श्री. प्रविण राजेंद्र भुजबळ, वय ३४ वर्षे, धंदा व्यवसाय रा. सेक्टर १८, प्लॉट नं. ४१८, पोलाईट हाईटस जवळ, शिवतेजनगर, चिखली प्राधिकरण, पुणे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चिखली पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर २०१ / २०२४, भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. उध्दव खाडे हे करीत आहेत.
चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगिक परिसरातील होणा-या चो-यांना प्रतिबंध करणे पोलीसांसमोर एक आव्हान होते. त्याप्रमाणे चिखली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.ज्ञानेश्वर काटकर यांनी तपास अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. उध्दव खाडे यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्याप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक श्री. उध्दव खाडे यांच्या पथकाने घटनास्थळाचे परीसरातील सर्व बाजुने येणा-या जाणा-या रस्तावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्याना दि. ०५/०४/२०२४ रोजी रात्री ०२.१० वाजण्याचे सुमारास घटनास्थळावर एक मोटारसायकल व एक टेम्पो आल्याचे दिसुन आले. त्यामधुन आलेल्या इसमांनी कंपनीमधुन लोखंडी बार चोरी करून घेवुन गेल्याचे दिसुन आले. सदर टेम्पोचा नंबर झुम करुन पाहिला असता तो एम. एच. १४. जेएल.०४८२ असा असल्याचे दिसुन आले.
लागलीच त्यांनी सदर नंबरच्या डिटेल्स पाहिल्या असता सदर टेम्पो आशिष गवळी राह. पिंपरी गाव मो. नंबर ८५३०६५२८२८ असा होता. म्हणुन सदर मोबाईल नंबरवर संपर्क केला असता टेम्पो मालक आशिष गवळी यांनी सुमारे १ वर्षापुर्वी सदरचा टेम्पो रामविलास यादव राह. पुनावळे यास विकल्याचे सांगितले. त्याप्रमाणे त्याच्या मोबाईल नंबरचे लोकेशन घेतले असता ते
पुनावळे येथील आल्याने सदर ठिकाणी जावुन शोध घेतला असता इसम नामे रामविलास यादव हा मिळुन आला. त्याचेकडे टेम्पो नंबर एम. एच. १४. जेएल. ०४८२ याबाबत विचारणा केली असता सदरचा टेम्पो त्याने अफझल युनुस मनियार यास दिला असल्याचे सांगुन टेम्पो आलम मनियार हा घेवुन गेला असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे पुनावळे भागात सापळा रचुन आरोपी नामे १) आलम युनुस मनियार वय ३३ वर्षे, राह. गायकवाडनगर, जी. के. रोज सोसायटीसमोर भंगार दुकानामध्ये, पुनावळे पुणे मुळ राह. ग्राम ईश्वरदासपुर, पो.उचहा, एनटीपीच्या बाजुला, ता. जि. रायबरेली, राज्य उत्तरप्रदेश २) जुबेर अब्दुल वहाब मेमन वय २७ वर्षे, राह. गायकवाडनगर, जी. के. रोज सोसायटी समोर भंगार दुकानामध्ये, पुनावळे पुणे मुळ राह. ग्राम याकुबपुरा, ता. जि. हैद्राबाद, राज्य आंध्रप्रदेश, ३) दिपक कपीलदेव तिवारी वय २२ वर्षे, राह. गायकवाडनगर, जी. के. रोज सोसायटीसमोर भंगार दुकानामध्ये, पुनावळे पुणे मुळ राह. ग्राम मनकापुर, ता. तुलसीपुर, जि. बलरामपुर, राज्य उत्तरप्रदेश यांना गुन्हयात वापरलेला टेम्पो नंबर एम. एच. १४. जेएल.०४८२ याचेसह ताब्यात घेवुन तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचे सोबत त्यांचे साथीदार पाहिजे असलेले आरोपी ४) अफझल युसुफ मनियार पत्ता माहीती नाही, ५) छोटु ऊर्फ शामलाल यादव पत्ता माहीती नाही असे असल्याचे सांगितले. वरील तिन्ही आरोपींना दाखल गुन्हयामध्ये अटक करुन त्यांचेकडुन गुन्हयातील गेलेला १,७५,५००/- रुपये किंमतीचे लोखंडी डायमिटरचा सर्व मुद्देमाल व गुन्हा करताना वापरलेला टेम्पो हस्तगत करण्यात आलेला आहे. यांतील पाहिजे आरोपीत यांचा पोलीस शोध घेत आहेत.
सदरची कामगिरी मा. श्री. शिवाजी पवार, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-३, पिंपरी चिंचवड, मा. श्री. संदीप हिरे, सहा. पोलीस आयुक्त, भोसरी विभाग यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री. ज्ञानेश्वर काटकर, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, चिखली पोलीस स्टेशन यांचे अधिपत्याखाली सपोनि / श्री उध्दव खाडे, पोहवा / सुनिल शिंदे, पोहवा / बाबा गर्जे, पोहवा / चेतन सावंत, पोहवा / भास्कर तारळकर, पोहवा / संदिप मासाळ, पोहवा / दिपक मोहिते, पोहवा/अमोल साकोरे, पोना/ अमर कांबळे, पोना / कबीर पिंजारी, पोना / संदीप राठोड पोशि/ संतोष सकपाळ, पोशि/ संतोष भोर, पोशि/ सातपुते यांनी यशस्वी रित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!