महाळुंगे MIDC येथील कंपनीतून इंम्पोर्टेड रबरी पार्ट चोरी प्रकरणी आरोपीस, ६,७५,०००/- रु. किंमतीच्या मुद्देमालासह अटक..
खंडणी विरोधी पथकाची कारवाई…
प्रतिनिधी महाळुंगे एमआयडीसी दि. १० एप्रिल २०२४ मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तसेच गुढीपाडवा, रमजान ईद च्या अनुषंगाने आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये कोणताही अनुचीत प्रकार घडू नये याकरीता पाहीजे फरारी व तडीपार आरोपी तसेच संशयीतांची तपासणी मोहिम राबविणेबाबत गुन्हे शाखांच्या सर्व अधिकारी यांना सराईत गुन्हेगारांचे हालचालीवर लक्ष ठेवणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.
त्यानुसार आमचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखे कडील खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे चिखली पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना, पोहवा ७०५ काळे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, टाटा पिकअप गाडी नं एम एच १४ जे. एल. ५०८४ या गाडीत चोरीचा माल घेवुन चिखली येथे विक्रीसाठी येणार आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने, वपोनि संतोष पाटील व पोउपनिरी सुनिल भदाणे हे सदर ठिकाणी जावून, स्टाफला सूचना देवून सापळा लावून इसम नामे शफिक यासीन पठाण वय ४९ वर्ष रा. निमगाव खंडोबा, ता.खेड जि.पुणे यास १,७५,०००/- रु किंच्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे रबरी पार्ट व गुन्हयात वापरलेली टाटा पिकअप टेम्पो असा एकुण ६,७५,०००/- रु किंच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याचेकडे तपास करता, त्याने सदरचा माल इसम नामे सनी भिवरकर याचेसह जयश्री पॉलीमर कंपनी, महाळुंगे एमआयडीसी, पुणे येथून चोरी केले असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत महाळुंगे MIDC पोलीस स्टेशन येथे खात्री करता, महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २२६ / २४ भादवी कलम ३८१, ४०८,३४ असा गुन्हा दाखल असल्याने, सदर आरोपीस मुद्देमालासह महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा.वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, मा.संदिप डोईफोडे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, मा. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली संतोष पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक सुनिल भदाणे, तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार निशांत काळे, शैलेश मगर, प्रदीप गायकवाड, भारत गाडे यांचे पथकाने केली आहे.