आर्थिकगून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहर

बनावट शेअर ट्रेडिंग ॲप मध्ये पैसे गुंतवणुक करण्यास लावुन आर्थिक फसवणुक करणा-या टोळीला पिंपरी चिंचवड सायबर सेलकडुन अटक.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ११ एप्रिल २०२४ दिनांक २२/०२/२०२४ रोजी बाणेर येथिल महिला तीचे इन्स्टाग्राम अकाऊंट हाताळत असतांना त्यांना शेअर मार्केट क्लासेस व शेअर मार्केट इन्वेस्टमेंट संदर्भात पोस्ट लिंक दिसत होत्या. त्यामध्ये फिर्यादी यांना आवड
असल्याने त्यांनी सदर लिंक वर क्लिक करुन त्यांनी दिलेले सुचनेप्रमाणे कार्यवाही करत गेले होत्या. त्यानंतर फिर्यादी यांना Schoder Academy VIP 34 या व्हॉटसअप ग्रुपवर जॉईन केले गेले. फिर्यादी सदर व्हॉटसअप ग्रुपवर जॉईन झाल्यानंतर त्यांना इन्सटीटयुशनल डिमॅट अकाऊंट काढण्यासाठी एक फॉर्म पाठवुन फिर्यादी यांचे इन्स्टयुशन अकाऊंट काढुन देण्यात आले होते. त्यानंतर फिर्यादी यांना आय.पी. ओ शेअर खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या बँक अकाऊंटला पैसे पाठविण्यासाठी सांगीतले होते. त्यावेळी फिर्यादी यांनी वेगवेगळया बँकेच्या अकाऊंटला पैसे पाठविले होते. अशा प्रकारे फिर्यादी यांना एकुण ३१,६०,०००/- रुपयांची गुंतवणुक करण्यास लावली व तसेच सदरची रक्कम फिर्यादी यांनी वेळोवेळी मागितली असता फिर्यादी यांना चॅरिटी डोनेशनसाठी अधिक ४,००,०००/- रुपये भरण्यास लावुन सदरची रक्कम भरल्यानंतर देखील गुंतवणुक केलेली रक्कम परत न देता फिर्यादी यांची एकुण ३५,६०,०००/- रुपयांची आर्थिक फसवणुक केली. त्याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं ४३५ / २०२४ भादवि कलम ४२०,४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाच्या अनुषंगाने सागर पोमण, पोउपनि, सायबर सेल, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड यांनी बँक अंकाउट व मोबाईल क्रंमाक यांचे तांत्रिक विश्लेषणाव्दारे आरोपीचा शोध घेवुन आरोपी नामे १) जुनेद मुख्तार कुरेशी वय २१ वर्ष रा. फ्लॅट नंबर १०२ सनराईज रेसीडेन्सी लेन नं १४. टिंगरे नगर, पुणे – ४११०३२. २) सलमान मन्सुर शेख, वय २२ वर्ष रा. सर्व्हे नंबर २४१, इंदीरानगर, लोहगाव रोड, ब्रम्हासेल, पुणे. ३) अब्दुल अजीज अन्सारी वय २३ वर्ष रा. लक्ष्मी मीनी मार्केट जवळ, इंदिरा नगर, बर्मा सेल, लोहगाव रोड, पुणे. ४) आकिफ अन्वर अरिफ अन्वर खान वय २९ वर्ष रा. बिल्डींग १ए, फ्लॅट १०२, एच.एम. रॉयल कोंढवा खुर्द- ४११०४८ ५) तौफिक गफ्फार शेख वय २२ वर्ष रा. इंदीरा नगर, बर्माशेल, लोहगाव रोड, पुणे. यांचा दाखल
गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात येवुन दाखल गुन्हयातील आरोपीकडुन ०७ मोबाईल फोन्स, ०१ रोख रक्कम मोजण्याची मशीन, वेगवेगळया बँकेचे ०८ डेबिट कार्डस, १२ विविध बँकाचे चेकबुक्स, ०१ पंजाब नॅशनल बँकेच पासबुक तसेच रोख रक्कम ७ लाख रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दाखल गुन्हयामध्ये अटक केलेल्या आरोपीकडे १२० पेक्षा जास्त बँक अकाऊंट मिळुन आले असुन त्या बँक अकाऊंटवरुन आरोपीने ०४ कोटीपेक्षा जास्त रक्कम रोख स्वरुपात बँकेमधुन काढुन ती यु. एस. डी. टी या क्रिप्टोकरन्सी मार्फत हाँगकाँग या देशात पाठविण्यात आली असल्याचे निष्पन्न होत आहे. सदर बँक खात्याबाबत एकुण ७५ पेक्षा अधिक तक्रारी प्राप्त असुन त्याबाबत अधिक तपास चालु आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास सागर पोमण, पोउपनि, सायबर सेल, पिंपरी चिंचवड हे करत आहेत.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. संदिप डोईफोडे पोलीस उपआयुक्त, गुन्हे पिंपरी चिंचवड, मा. विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि संतोष पाटील, सपोनि प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोशि २५६२ नितेश बिचेवार, पोशि २५६३ अतुल लोखंडे, पोशि ३०८० श्रीकांत कबुले, पोशि २३०० कृष्णा गवळी, पोशि ३५३६ रजनिश तारु, पोशि ३०८१ सौरभ घाटे, मपोशि आशा सानप, मपोशि ईश्वरी आंभरे ( सर्व नेमणुक सायबर सेल ) यांच्या पथकाने केली आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!