गून्हापोलिसमहाराष्ट्रविशेषशहर

पिंपरी -चिंचवड परिसरातील कुख्यात गुन्हेगारास अटक करुन ०१ पिस्टल, ०२ मॅक्झीन व ०२ जिवंत काडतुसे केली जप्त

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ११ एप्रिल २०२४ पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साहेब, मा. अति. पोलीस आयुक्त वंसत परदेशी साहेब, मा. पोलीस उपआयुक्त स्वप्ना गोरे मॅडम, मा. सहा पोलीस आयुक्त सचिन हिरे साहेब यांनी वाढत्या गुन्हेगारीस आळा बसावा व गुन्हेगाराकडुन सर्रासपणे होत असलेल्या अग्नीशस्त्राचा वापर व येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अग्नीशस्त्राचा वापर होवुन गुन्हे घडण्याची शक्यता लक्षात घेवुन अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश दिले व त्याप्रमाणे सुचना केल्या.
त्याप्रमाणे श्री. नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री भारत शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोसरी पोलीस ठाणे यांनी वरीष्ठांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगाराविरुध्द कडक कारवाई करण्याबाबत तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक बालाजी जोनापल्ले, पोलीस उप निरीक्षक मुकेश मोहारे व अमंलदारांना मार्गदर्शन करून त्यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे दिनांक ०९/०४/२०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे, पोलीस उप-निरीक्षक बालाजी जोनापल्ले, सहा पोलीस फौजदार राकेश बोयणे, पो.हवा ८३१ खरात, पोना १८५० पोटे, पोना १८१० भोजणे, पोशि २६६४ गोपी, पोशि २६५१ वराडे, पोशि २४४४ जाधव असे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी पोलीस स्टेशन यांच्या आदेशान्वये भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत खाजगी वाहनाने भोसरी परिसरात रेकार्डवरील आरोपीचा शोध घेत असताना सहा पोलीस फौजदार राकेश बोयणे यांना मिळालेल्या बातमी नुसार खुन, मारामारी, आर्म अॅक्ट असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपी नामे अमोल फिलीप साळवे, वय-३० वर्षे, रा. गव्हाणे पेट्रोलपंपाच्या पाठीमागे, विठ्ठल दर्शन सोसायटी, फ्लॅट नंबर १९, आंळदी रोड, भोसरी पुणे हा देवकर वस्तीकडे जाणाऱ्या रोडवरून, वाळके यांचे गोटयाकडे जाणाऱ्या कच्या रोडवर भोसरी पुणे येथे पिस्टल सदृश्य हत्यार घेवुन फिरत आहे, अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्याप्रमाणे सापळा रचुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एकुण ५७,०००/- रूपये अंदाजे किमतीचा एक पिस्टल दोन मॅक्झीनसह व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्याबाबत भोसरी पोलीस स्टेशन गु र नं २४७ / २०२४ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर इसमास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदर कामगिरी मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, मा. अति. पोलीस आयुक्त, श्री. वसंत परदेशी सो, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ १ श्रीमती स्वप्ना गोरे मॅडम, सहायक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग श्री. सचिन हिरे, श्री. नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री.भारत शिंदे पोलीस निरीक्षक (गुन्हे) भोसरी पोलीस ठाणे यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोउनि श्री बालाजी
जोनापल्ले, पोउपनि श्री. मुकेश मोहारे, सहा पोलीस फौजदार राकेश बोयने, पोलीस हवा हेमंत खरात, महिला पोलीस हवालदार प्रतिभा मुळे, पोलीस अंमलदार नवनाथ पोटे, प्रकाश भोजणे, स्वामी नरवडे, सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, तुषार वराडे, ज्ञानेश्वर साळवे, नुतन कोंडे यांनी सदरची
उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button