महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

प्राध्यापक कु.अलका डोंगरे यांना पी. एच. डी. विद्याविभूषित पदवी बहाल..

प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, दि.२९ जानेवारी २०२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने प्रा.अलका डोंगरे यांना वृतपत्र विद्या व जनसंवाद या विषयातील पीएचडी २० जानेवारी २०२४ रोजी प्रदान केली आहे. माजी कुलगुरू डॉ .सुधीर गव्हाणे गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महिला सक्षमीकरण विषयक संवाद, एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावरील प्रबंध सादर केला .
प्रा. अलका डोंगरे या नेट पास असून त्यांना या संशोधनासाठी इंडियन कौन्सील ऑफ़ सोशल सायन्स रीसर्चची ( आयसीएसएसआर, नवीदिल्ली) डॉक्टरल नँशनल फेलोशीप मिळालेली होती. त्यांना अध्यापनाचा आठ-नऊ वर्षांचा मौलाना आझाद संस्थेच्या हॉर्निमन कॉलेजचा अनुभव आहे. विद्यापीठ विभागातही त्यांनी क्लॉक अवर बेसीसवर अध्यापन केलेले आहे. अभ्यासातून महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३० च्या दशकातच मांडला होता हे स्पष्ट झाले आहे. महिलाविषयक क़ायदे व हिंदू कोड बीलावरील भाष्य व संवादातून डॉ. आंबेडकर यांनी यच्चयावत महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिलेले मौलिक योगदान या प्रबंधात मांडलेले आहे. पीएच.डी प्राप्त झाल्याबद्दल अलका डोंगरे यांचे सोहनलाल गिधा इंटरनॅशनल बुध्दिस्ट ट्रस्ट जालंदर, चंद्रसेन डोंगरे, अरविंद सोनटक्के व विभागप्रमुख डॉ.दिनकर माने यांनी अभिनंदन केले आहे.

तसेच बुद्ध लेण्या मुक्ती आंदोलन समिती महाराष्ट्र राज्य, लेणी प्रेमी इतिहास प्रेमी राजू भालेराव, मनोज गजभार, रवी कांबळे, महायान मसुरे, सुजाताताई नवघरे, प्रियाताई शेख, रोहिणी ताई लादे, लक्ष्मण रोकडे सर वरिष्ठ पत्रकार मूकनायक यांच्या वतीने प्रा. अलका डोंगरे मॅडम यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!