गुरु शिष्यांचा जयंती मोहोत्सव उत्साहात साजरा-प्रा. बी. बी. शिंदे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १५ एप्रिल २०२४ क्रांतिसूर्य महामानव महात्मा जोतीराव फुले यांचा १९७ वा, आणि विश्वरत्न, बोधिसत्व, भारतीय संविधानाचे शिल्पकार, प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३३ वा जयंती मोहोत्सव भीमरत्न प्रतिष्ठान, बालाजीनगर, भोसरी पुणे २६ यांचे विध्यमाने काल दि. १४ एप्रिल २०२४ रोजी साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला माजी नगरसेवक मान्यवर संजय वाबळे व भोसरी पोलिश स्टेशन चे पी. आय. मान्यवर जमादार साहेब साहेब, यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी उपस्थित उपासक व उपासिकांनी, पंचशील, बुद्ध वंदना पठण करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना (महा. राज्य ) या सामाजिक संघटनेची पुणे जिल्हा बांधणी करण्यासाठी, या सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष भीमरत्न, प्रा. बी. बी. शिंदे यांनी जिल्ह्यांवर काम करण्यासाठी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करुन, त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली.
त्यामध्ये मान्यवर सुनील सखाराम वाघमारे रा. बालाजीनगर, भोसरी, यांची पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड करुन, तसे त्यांना नियुक्ती पत्र उपस्थित सर्वांच्या साक्षीने देण्यात आले. तसेच पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी मान्यवर महिंद्र रवींद्र वाघमारे रा. बोपखेल पुणे यांची निवड करुन नियुक्ती पत्र देण्यात आले. तर पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी मान्यवर विशाल भीमराव हाके, रा. आदर्शनगर, मोशी यांची निवड करुन त्यांना
नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच मान्यवर शेखलाल नदाफ साहेब, रा. आदर्शनगर, मोशी यांची पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करुन, नियुक्ती पत्र दिले. या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून, जेष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी
जेष्ठ नागरिक संघाची स्थापना करून, पुणे जिल्ह्यातील अध्यक्ष पदी मान्यवर गोविंद दत्तू गाडे साहेब, फुले शाहू आंबेडकर चळवळीतील प्रबोधनकार, रा. लालटोपी नगर, पिंपरी, यांची निवड करुन, त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांना विष्णू वाघमारे यांचेवतीने अल्पोपहार वाटप करण्यात आला.
यानंतर बूद्ध विहार या ठिकाणी विहार कमिटीचे अध्यक्ष मा. अविनाश भालेराव साहेब यांचे अध्यक्षते खाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महामानावाची जयंती का करावयाची,? आणि ती कोणी करावयाची ? आपण प्रत्येक वर्षी जयंती अति उत्साहात साजरी करतो, परंतु त्या महा मानवाच्या उद्धिष्टांन प्रति किती पोहनचलो, याचा लेखा जोखा, आपण करतो का?याचा कधी आपण विचार केला का? ज्या महामानवाने या देशाचे संविधान लिहून प्रजासत्ताक लोकशाही दिली, त्या सविधानालाच आज सत्ताधारी वर्ग बाजूला करुन, मनुस्मृती लागू करु पाहत आहे, यासाठी आज रात्रच नव्हे तर दिवसही धोक्याचा आहे, त्यामुळे आपणाला जागृत राहून, संविधान बचावाची भूमिका घ्यावी लागेल, असे प्रा. बी. बी. शिंदे म्हणाले, यावेळी आर. पी. आय. (आठवले ) नेते मा. बाळासाहेब भागवत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, तसेच बूद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष मा, भालेराव साहेबांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, या समाजिक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष मा. लक्ष्मण रोकडे, राज्य सचिव हरीचंद्र (अप्पा ) शिंदे, राज्य सह संघटक मा. रामभाऊ ओव्हाळ, या सामाजिक संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सागर राजू ओरसे, लांडगे विठ्ठल, विक्रम वाघमारे, कुसुम लोणके, चासकर साहेब, कांबळे साहेब, भारत घरड, सीताराम बनसोडे, संजय भोसले, केशव शिंदे, दिलीप बनसोडे, दिवटे साहेब, मा. पिंटू जाधव, मा. लक्ष्मण विटकर, मा. गीताराम वाघमारे, तसेच भीमरत्न प्रतिष्ठानचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला वर्ग उपस्थित होते.
मान्यवर सागर ओरसे यांनी स्वागत आणि प्रस्थावना केली, तर भावी नगरसेवक मान्यवर महेंद्र सरवदे साहेब यांनी उपस्थितांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या.







