स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने श्री. रामराजे लोणकर यांची गेवराई तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती..

प्रतिनिधी बीड गेवराई दि. १६ एप्रिल २०२४ स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. करुणा धनंजय मुंडे यांनी दि. २६ मार्च २०२४ रोजी रामराजे लोणकर यांचे समाजसेवेत असलेले काम पाहुन व बीड जिल्ह्यातील गेवराई येथे चांगला जनसंपर्क पाहुंण त्यांना आदरणीय सौ. करुणाताई धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार पक्ष वाढीसाठी, संघटना बांधणीसाठी गेवराई, तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
रामराजे लोणकर हे मुळचे गेवराई येथील रहिवासी आहेत. सतत समाज सेवेत सक्रिय पणे पुढाकार घेऊन समाज हितासाठी लढत असतात. या वेळी आमच्याशी बोलताना रामराजे लोणकर यांनी सांगितले पक्षाने जो विश्वास माझ्यावर दाखवून मला तालुका अध्यक्ष पदीची नियुक्ती जाहीर केली. पक्षाने दिलेली जवाबदारी तन, मन, धनाने सांभाळेल मी विश्वासाने सर्व कामे करीन गेवराई तालूक्यातील जे जे ज्वलंत प्रश्न आहेत. त्या संदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून कशी सोडवायची या संदर्भात प्रामाणिक प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी आमच्याशी बोलताना दिली.
स्वराज्य शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष सौ. करुणा धनंजय मुंडे यांनी नियूक्ती पत्र देताना सांगीतले की आपण पक्षाचे ध्येय धोरणे, मोर्चे, आंदोलने यामध्ये कायम अग्रेसर असले पाहिजे. आपल्या हातून “स्वराज्यास” अभिप्रित असलेला पक्ष आपण उभा कराल असा विश्वास ठेवत त्यांनी पुढील राजकीय वाटचालीसाठी श्री. रामराजे झुंबरराव लोणकर यांना करुणा धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.
जनतेच्या सेवेसाठी आई भवानी आपणाला उदंड बळ आणि उदंड आयुष्य देवो अशी सदिच्छा ही व्यक्त केली.
यावेळी जिवन यादव, सचिन लोणकर, नितीन लोणकर, फड सर, विलास मस्के, रमेश मस्के, अशोक लोणकर,
राजेद्र देवकते, नितीन देशमुख हे उपस्थित होते यांनी ही नियूक्तीनंतर श्री. रामराजे झुंबरराव लोणकर यांना शुभेच्छा ही दिल्या.





