अभिवादनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लालटोपी नगर मोरवाडी येथे आरोग्य शिबीर संपंन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २६ एप्रिल २०२४ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त लालटोपी नगर मोरवाडी येथे लहूमुद्रा सेवा संस्था ( जय हिंद समाज मंदिर ) येथे मोठ्या उत्साहाने आरोग्य शिबिराचा उपक्रम राबविण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त झालेल्या शिबिराला मोठ्या उत्साहाने समाज बांधव उपस्थित होते. बाबासाहेबांची जयंती नाचून नाही तर वाचून व माणसांचे आरोग्य वाचवून साजरी करावी असा विचार या आरोग्य शिबीराच्या माध्यमातून देण्यात आला.
या उपक्रमास विशेषत: डी.वाय पाटील हॉस्पिटल तर्फे सहकार्य लाभले.
यावेळी उपस्थित मान्यवर श्री. अविनाश शिंदे, अंकुश फुलावले, युवानेते निलेश गायकवाड, अनिल लगाडे, अयुब पठाण, गोरख खवळे, ओंकार गायकवाड, गोविन्द रावत, भाऊसाहेब साबळे, व असंख्य समाजबांधव उपस्थित होते.




