
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०५ मे २०२४ अवघे आठ दिवस शिल्लक असताना वंचित बहूजन पार्टी व बहूजन समाज पार्टीचा दोन्ही लोकसभेत (मावळ, शिरूर) प्रचार दिसत नाही. या मूळे जनमानसात संभ्रम आहे की या पक्षाने उमेदवार दिलेत की नाही जर दिलेत तर ते प्रचार करताना का दिसत नाही.
मावळ लोकसभेत वंचितच्या माधवी जोशींचा प्रचार फक्त घाटाचे खालीच सूरू असल्याचे दिसते आहे. त्या पिंपरी चिंचवड मधे कधी आपल्या प्रचाराचा झंझावात उभा करणार. की बस भविष्यात माजी खाजदारकीचे उमेदवार म्हणून घेणार. मागील पोट निवडणूकीचा अनुभव समोर ठेवला तर वंचितने कार्यकर्त्यांच्या निकाला विरूद्ध निर्णय घेवून तिन मोठे नेते गमावले होते या ही वेळी जोशीच्या विषयी असेच काही घडते आहे का?
कारण मावळ करिता वंचितचे नियोजित उमेदवार मारूती कांबळे होते पण त्यांना डावलून राष्ट्रवादी तून हकललेला उमेदवार अयात करण्यात आल्याने कार्यकर्ते नाराज झालेत का ? की कार्यकर्त्यांना उमेदवारा कडून तसा सन्मान मिळत नाही का ? अशा असंख्य कारणात उमेदवाराचा प्रचार रखडला गेलाय का ? पून्हा एकदा चिंचवड विधानसभेच्या पोट निवडणूकीनंतर दूसर्यांदा कार्यकर्ते “दूखी मन मेरे सून मेरा कहना, जहां नही चैना वहां नही रहना” चा सूर आळवताहेत का की आदरनिय प्रकाश आंबेडकरांचे मागे उभे राहणार हे पाहणे अवचिताचे ठरेल.
दूसरी कडे बसपाचे राजाराम पाटील यांचा ही मावळमध्ये फक्त घाटाचे खालीच प्रचार सूरू असल्याचे सांगीतले जाते पाटलांना पिंपरी चिंचवड करांच्या मताची गरज भासत नाही का ? आंबेडकरवादी पक्षाचे उमेदवार कधी मनापासून प्रचारात उतरणार कधी प्रचार करणार वेळ कीती आहे याचे वर कोण या नेत्याना प्रश्न विचारणार पक्षाचे वरिष्ठ नेते या उमेदवारांना कधी कामाला सूरूवात करायला लावनार आंबेडकरवादी पक्षाची उमेदवारी देताना उमेदवार या सर्व बाबींनवर सक्षम आहे का हे पाहिले जात नाही का की कोणी ही या आणि पक्षाचे टिकिट घ्या असे काही होतय का ? असे असंख्य प्रश्न उत्तरा विना अन समाज धावतो ईतर मोठ्या पक्षाचे मागे पून्हांन पून्हां चूक कोणाची विचार करायला हवा पक्षाने व उमेदवाराने आपण काय चूकलो व का चूकलो कोणाच्या सांगण्यावरून आपण हा उमेदवार मतदारांवर लादला यावर मंथन व्हायला हवे या भावना आंबेडकरी जनतेने व्यक्त केल्या आहेत जनता या सर्व आंबेडकरी पक्षांनवर नाराज असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून समजते.



