थेऊर येथील ग्रामस्थांकडून आढळराव पाटील यांचे उत्साहात स्वागत..

हवेली : महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हवेली तालुक्यातील थेऊर येथे गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी गणपती मंदिरात आरती करुन गावभेटीस सुरवात करण्यात आली. उमेदवार आढळराव पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीपदादा कंद, शामराव गावडे, माजी संरपंच नवनाथ काकाडे, यशवंतराव चव्हाण साखर कारखाना संचालक मोरेश्वर काळे, रविंद्र कंद, गणेश गावडे, बाबासाहेब काकडे ग्रामपंचायत सदस्य राहुल कांबळे आदी महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, बोलताना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, “चिंतामणी बाप्पााला स्मरुन
सांगतो मला खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली तर मतदार संघाचे प्रलंबित असलेले प्रश्न मी नक्की मार्गी लावील.ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची आहे. या निवडणूकीत आपण आपल्या देशाचे पंतप्रधान ठरवणार आहोत. येथे खरी लढत आदरणीय विकासपुरुष नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यात आहेत.परंतू कुठल्याही व्यक्तीला विचारले तर पंतप्रधान पदासाठी मोदीजीच हवेत असे नागरिक सांगतात. कारण राम मंदिरासारखा आपल्या अस्मितेचा प्रश्न फक्त आदरणीय मोदीजीच सोडवू शकले. 370 सारखे कलम फक्त मोदीजी यांनीच काश्मीरमधून हटविले. मोदीजी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 72 हजार कोटी जमा केले. येथे गावातील नदीवरील पुलाची मागणी होती मी 30 कोटी आणले आणि काम सुरु झाले. माझी निष्ठा ही जनतेशी आहे. संसदरत्न सुरु झाल्यापासून पहिले तीन माझ्या नावावर आहेत. कात्रज घाटापासून ते नाणेघाट असा पायाला भिंगरी लावून मी मी प्रवास केला आहे. तो फक्त माझ्या जनतेसाठी. रेल्वे प्रकल्प रद्द झाला तो निष्क्रिय खासदारामुळेच. विद्यामान खासदाराने कोणतीही विकासकामे केली नाहीत. मी 20 वर्षांत अनेक प्रकल्प मतदार संघात आणून मतदारसंघाचा कायापालट केला आहे. मोदीजी यांच्या विचाराचा पुर्णवेळ खासदार आपल्याला विजयी करायचा आहे. कोरोना काळात मी जीवाची पर्वा न करता माझ्या मतदार संघातील नागरिकांना आधार देण्याचे काम केले. त्यामुळे आता आदरणीय मोदीजी यांच्या विचाराचा खासदार निवडून द्या. येणाऱ्या 13 तारखेला आपण घड्याळासमोरचे बटन दाबून मला जास्तीत-जास्त मतदान करावे हीच विनंती करतो.
दरम्यान, प्रदीप कंद म्हणाले, मागच्या वेळी शिवाजीदादांचे चिन्ह हे धनुष्यबाण होते, यावेळी मात्र दादांचे चिन्ह हे घड्याळ आहे. त्यामुळे संभ्रम होतो आहे, तो दूर करण्यासाठी हे चिन्ह घराघरांत पोहचवा. ती आपली जबाबदारी आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केलेल्या व्यक्तीला आपण मागील वेळी निवडून दिले, परंतू त्या व्यक्तीने कुठलीही कामे केली नाहीत. त्याचे परिणाम आज मतदार संघातील जनता भोगते आहे. आपल्याला 11 कोटी रुपयांचा निधी हा दादांच्या प्रयत्नामुळे मिळाल आहे.कारखाना सुरु व्हावा याबाबत विद्यमान खासदाराची काहीच भूमिका दिसत नाही. आता आपल्याला आपल्या हक्काच्या माणसाला म्हणजे शिवाजी दादांना संसदेत पाठवायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी भरघोस मतदान करावे.
मोरेश्वर काळे म्हणाले की, कुठल्याही नागरिकाने फोन केला तरी फोनवर तात्काळ रिप्लाय देणारा पहिला नेता मी पाहिला आहे. हे फक्त शिवाजीदादाच करु शकतात. कारखाना सुरु करताना यामध्ये शिवाजीदादांचे मोठे योगदान आहे. आता आपण मागील वेळेला केलेली चुक सुधारून दादांना खासदार करायला हवे. यावेळी घड्याळाला जास्तीत-जास्त मतदान करुन दादांना भरघोस मतांनी विजयी करावे. यावेळी गावांतील अनेक नागरीकांना भाषण केले. दादांना विजयी करण्याचे आवाहन केले.



