प्रतिनिधी दि. १० मे २०२४
दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. ते गेले ५१ दिवस तिहार तुरंगात होते. मात्र, लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रचार करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. आज म्हणजे शुक्रवारी १० मे रोजी सर्वोच्च न्यायालय या याचिकेवर निकाल देण्याची शक्यता होती. मात्र, यापूर्वी ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेला विरोध केला होता. निवडणूक प्रचार करणे हा मूलभूत अधिकार नसल्याचा युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला होता. परंतू हा यूक्तीवाद डावलत शेवटी सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला व दिल्लीचे मूख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. या निकालाने आम आदमी पार्टीच्या सर्व नेते कार्यकर्त्यांनी आपसात शूभेच्छा देत आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यांच्या जामिनाने INDIA आघाडीची ताकद वाढणार आहे.