गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर, सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेप..

प्रतिनिधी पूणे दि. १० मे २०२४ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला. पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. गेल्या ११ वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याचा निकाल अखेर लागला. या प्रकरणातील ०५ आरोपींपैकी इतर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोकलकर यांनी प्रतिक्रिया दिली. त्या बोलल्यी की विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय दृष्टीपथात येतो, ११ वर्षांनी या खटल्याचा निकाला लागला आहे. जे खरे शूटर्स होते, त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली ही महत्वाची बाब आहे. आम्ही समाधानी आहोत, असं त्यांनी नमूद केलं.
काय म्हणाल्या मुक्ता दाभोलकर ?
गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास आणि नालासोपारा शस्त्रसाठा जेव्हा पकडला गेला तेव्हा २०१८ साली सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे दोघे आरोपी पकडले गेले. त्याच्याआधी जवळपास २०१३ ते २०१८ अशी पाच वर्ष हा तपास एका टप्प्यावर येऊन थांबला होता. आज आम्हाला असं वाटतंय की जे खरे शूटर्स होते, त्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली ही महत्वाची बाब आहे. आम्ही समाधानी आहोत. ही संपूर्ण ११ वर्षांची लढाई महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व हितचिंतक ही लढाई लावून धरली. त्यामुळे ११ वर्षानंतर विवेकाच्या मार्गाने जाऊन न्याय दृष्टीपथात येतो ही भावना आमच्या मनात जागृत राहिली आहे. आणि लोकशाहीसाठी देखील ही उपकृत भावना आहे, अशी प्रतिक्रिया मु्क्ता दाभोलकर यांनी दिली.
या प्रकरणातील दोन आरोपींना शिक्षा झाली आहे, ही महत्वाची गोष्ट आहे, त्याबद्दल आम्ही समाधानी आहोतच. मात्र ज्या तीन जणांना शिक्षा झाली नाही, ज्यांना निर्दोष सोडण्यात आलं त्यासंदर्भात आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत निश्चितच जाऊ. आमच्या वकिलांच्या मार्गदर्शनाखाली यासंदर्भात पुढे वाटचाल करू असे ही त्या या वेळी बोलल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!