देश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

भव्य रॅली काढून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटलांच्या प्रचाराची सांगता

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला साथ अन् मशालीला मत द्या, शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे यांचे मतदारांना आवाहन..

पिंपरी चिंचवड दि. ११ मे २०२४ उत्तम, चारित्र्य संपन्न, मुत्सद्दी व जनतेच्या हितासाठी झटणारा व झगडणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या ज्या वेळेस राष्ट्र संकटात आले. तेव्हा पळून न जाता शिवाजी राजांच्या एका आदेशावर युद्धामध्ये मराठा सैनिक लढले. तसेच ज्या ज्या वेळेस देशावर संकट येते. तेव्हा तेव्हा महाराष्ट्र धावून जातो. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानाला साथ देण्यासाठी मशालीला मत देवून संजोग वाघेरे पाटील प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी मांडले.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार, दिनांक ११ मे २०२४ रोजी चिंचवड विधानसभा क्षेत्रात भव्य दुचाकी व चारचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर काळेवाडीतील ज्योतिबा मंगल कार्यालयात झालेल्या सांगता सभेत ते बोलत होते. या प्रसगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील, उमेदवार संजोग वाघेरे पाटील, राज्य संघटक एकनाथ पवार, जिल्हाप्रमुख माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, मावळ लोकसभा प्रचार प्रमुख योगेश बाबर, स्वराज इंडियाचे नेते मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, आम आदमी पार्टीचे पदवीधर प्रदेशाध्यक्ष चेतन बेंद्रे, महिला शहराध्यक्षा मीनाताई जावळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरद पवार) गटाच्या पिंपरी चिंचवड महिला शहरअध्यक्षा ज्योतीताई निंबाळकर, शिवसेना शहर संघटिका अनिताताई तुतारे, केश्रीनाथ पाटील, युवासेना प्रमुख चेतन (अण्णा) पवार, यांच्यासह सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. बानगुडे पाटील यांनी आपल्या ओघवत्या भाषण शैलीतून महाराष्ट्राचे राजकारण बिघडविणा-यांचा समाचार घेतला. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी कायम राष्ट्राला आणि स्वराज्याला पहिले प्राधान्य दिले. महाराष्ट्राच्या अस्मितेला, सुसंस्कृत राजकीय परंपरेला डाग लावण्याचे काम आताच्या राजकारणाने झाल्याची टीका त्यांनी केली. तर कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. या लोकसभा निवडणुकी महाराष्ट्र देशाला दिशा देण्याचे काम करणार असून देशात बदल निश्चित होणार असल्याचे म्हटले. तसेच, मावळ लोकसभेतून उद्बव ठाकरे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी लोकसभेत संजोग वाघेरे यांना पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळपासून किवळेगाव चौकातून रॅलीला सुरुवात झाली. पुढे मुकाई चौक – विकासनगर – आदर्शनगर – शिंदे वस्ती – भोंडवे कॉर्नर – आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज – धर्मराज चौक – गुरुव्दारा चौक – वाल्हेकरवाडी चौक – डांगे चौक – काळाख़डक – वाकड – दत्त मंदिर रो़ड – – काळेवाडी फाटा – पिंपळे निलख – पिंपळे सौदागर – शिवार चौक – रहाटणी फाट्यानंतर ज्योतिबा मंगल कार्यालयात या रॅलीचा समारोप झाला. रॅलीत ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव करत संजोग वाघेरे यांचे महिला व युवा वर्गाकडून भव्य स्वागत करण्यात आले. त्यांना ज्येष्ठ नागरिकांनी विजयासासाठी आशिर्वाद दिेले. रॅलीत सहभागी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मतदारांना संजोग वाघरे यांचे मशालीचे चिन्ह आणि मतदान यंत्रावरी तिसरा क्रमांक लक्षात ठेवून मतदान करावे आणि संजोग वाघेरे पाटील यांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्यासाठी साद घातली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!