आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
बोपखेल गावातील नदीपात्रातील जलपर्णी व होण्यार्या मच्छराच्या तातडीने उपाय योजना करण्यात बाबत – श्री भाग्यदेव एकनाथ घुले
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ मे २०२४ बोपखेल रामनगर, गणेशनगर भागात मुळा-मुठा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचलेली आसल्या मुळे अनेक साथीचे रोग बोपखेल व उपनगरांमधील नागरिकांनला होत आहे नदी पात्राची दशा ही एखाद्या खेळण्याच्या मैदाना प्रमाणे झाली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील शेवटच्या ठिकाणी गाव असल्या मुळे अनेक विकासकामे करण्यासाठी टाळाटाळ केली जाते व विकास कामांसाठी बोपखेल गाव वंचित ठेवलं गेलं आहे.
कमीत कमीत आरोग्याच्या दृष्टीने तरी बोपखेल मुळा-मुठा नदीच्या पात्रातील जलपर्णी काढण्यासाठी सुरुवात करवी असे यावेळी श्री.भाग्यदेव एकनाथ घुले यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगीतले.