अनधिकृतमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महापालिकेच्या वतीने आज ४ फलकांवर निष्कासनाची कारवाई…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ मे २०२४ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत जाहिरात फलक निष्कासनाची कारवाई सुरू असून आज एकूण ४ अनधिकृत फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच ९ फलक धारकांनी स्वत: प्रशासनाला सहकार्य करत त्यांचे अनधिकृत फलक हटविले असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
या कारवाई दरम्यान सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, उप आयुक्त संदीप खोत, कार्यालय अधिक्षक ग्यानचंद भाट, परवाना निरीक्षक, मजूर, एमएसएफ जवान तसेच महापालिका सुरक्षा रक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
आज झालेल्या कारवाईत एकूण १३ अनधिकृत फलक हटविण्यात आले असून त्यातील ९ फलक स्वत: फलक धारकांनी हटविले आहेत. यामध्ये नवीन भक्ती शक्ती मुकाई चौक रस्ता येथील ४०x१० चा फलक, शनि मंदिर रोड वाकड येथील १५x१५ चा फलक, बापुजी बुआ नगर मुंबई बेंगलोर हायवे साई पेट्रोल पंप येथील १०x१० चा फलक, भक्ती शक्ती चौक निगडी येथील ३०x२० चा फलक, यश साने पेट्रोल पंपाशेजारील बालाजी फर्निचर चिखली येथील २०x२० चा फलक, शेलार वस्ती देहु आळंदी रोड तळवडे येथील २०x२० चा फलक, सत्संग रोड सोनवणे वस्ती चिखली येथील ३०x२० चा फलक, मंगल नगर आयवाना बिल्डींग थेरगाव येथील २०x२० चा फलक म्हाडा प्रकल्प पुना मुंबई हायवे ताथवडे येथील फलक अशा एकूण ९ फलकांचा समावेश आहे.
महापालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आलेल्या ४ फलकांमध्ये कातळे वस्ती रावेत किवळे येथील ३०x२० चा फलक, तत्वन कन्स्ट्रक्शन कातळे वस्ती रावेत येथील ३०x२० चा फलक, जयवंत प्लाझा भोईर उड्डाण पुलाजवळ चिंचवड येथील ३०x३० चा फलक, सत्संग रोड चिखली येथील २०x२० चा फलक असे मिळून ४ फलक निष्कासित करण्यात आले.
कोट –
यापुढेही अनधिकृत फलक निष्कासनाची कारवाई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सुरू राहणार आहे यासाठी फलक धारकांनी तसेच जागा मालकांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

कोट – रेल्वे तसेच पीएमपीएमएल हद्दीतील अनधिकृत फलक हटविण्याबाबत पत्रव्यवहार करणार.
रेल्वे हद्दीतील तसेच पीएमपीएमएल हद्दीतील अनधिकृत जाहिरात फलक निष्कासित करण्यासाठीही महापालिकेने कार्यवाही सुरू केली असून यासाठी रेल्वेच्या तसेच पीएमपीएमएलच्या जागेवर असलेले फलक शासन धोरणातील तरतुदीनूसार उभारले नसल्यास संरचनात्मक लेखापरिक्षण करून असे अनधिकृत असलेले जाहिरात फलक किंवा होर्डिंग निष्कासित करण्याबाबत संबंधित प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे, अशी माहिती उप आयुक्त संदीप खोत यांनी दिली आहे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!