गून्हामहाराष्ट्रशहरसामाजिक

अमानुषपणे मारहाण करण्याऱ्या इसमांवर व पोलिसांवर कठोर कारवाई करावी – धर्मराज बनसोडे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २२ मे २०२४ मावळ लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर गेलेल्या वाकड येथील बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी विजय वाघमारे यांच्याशी अचानक काही इसमांनी नाहक वाद घालून मारहाण केली.
त्यांनंतर वाकड चौक PCMC शाळेमधील मतदान केंद्राच्या आवारात असलेल्या पोलिसांनी देखील मारहाण करण्यास सुरवात केली, यामुळे जखमी झालेले विजय वाघमारे यांचा २ दिवसांनी म्हणजेच १५ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे, खूप भयानक अशी घटना आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये घडलेली आहे. यामुळे मारहाण करणार्‍या इसमांवर व मारहाण करणाऱ्या पोलिसांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी लोकहितवादी सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष धर्मराज बनसोडे यांनी पोलीस उप-आयुक्त श्री. बापू बांगर यांच्याकडे मागणी केली.
यावेळी लोकहितवादी सेवा संघाचे संस्थापक-अध्यक्ष धर्मराज बनसोडे व संघटक राकेश चन्नाल तसेच कालकथित विजय वाघमारे यांचे पुतणे – विशाल भाऊ वाघमारे , ऋषिकेश वाघमारे (मुलगा), कुणाल वाघमारे (पुतणे) आतिश भाऊ दुधावडे (भाचा) तसेच इत्यादी सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!