
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड १४ ऑगस्ट २०२३ पिंपरी चिंचवड येथील डी. वाय. पाटील कॉलेज या ठिकाणी राज्यपालांचा दौरा असल्यामुळे शहरातील शिव, शाहू, फूले, आंबेडकरांना माननारे व भाजपाच्या विरोधात आक्रमक पणे विरोध करणार्या कार्यकर्त्यांना पिंपरी पोलिसांकडून डिटेन केले आहे. वेळोवेळी ही अशी दडपशाही केली जाते. विरोध होवू नये प्रश्न विचारू नये. म्हणून भाजप व शिंदे सरकार सत्तेचा असा गैरफायदा घेतात यात सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, राष्ट्रवादीचे पिंपरी शहराचे नेते देवेंद्र तायडे, बाळासाहेब रोकडे, शिवशंकर उबाळे आदींना पिंपरी पोलिसांनी सकाळी आठ वाजता ताब्यात घेतले आहे या दडपशाहीचा या चार ही नेत्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे.



