पोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

फिल्मच्या माध्यमातून द्वेष पसवणे बंद करावे म्हणून लोकशाही युवा फाउंडेशनच्या वतीने निवेदन देण्यात आले..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २६ मे २०२४ भारत देशामध्ये नवीन संस्कृती म्हणजे मुस्लिम समाजाचा द्वेष करणे, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे हेच सध्याची अवस्था आहे. या संदर्भात अने फिल्मस् बनवल्या गेल्या उदा. कश्मीर फाइल्स, केरला स्टोरी आणि आता “हम दो
हमारे बारा” असे वादग्रस्त चित्रपट बनवण्यात आलेले असून .
या चित्रपटाची निर्माते रवी गुप्ता, वीरेंद्र भगत आणि संजय नागपाल यांच्यावर मुस्लिम समाजाच्या व विशेषता मुस्लिम महिलांचे भावना दुखावल्या बद्दल चित्रपट निर्मातेवर
त्वरित चित्रपट भा.द‌ वि. कलम १५३,१५३ अ,१५३ ब, २९५ अ, २९८ ,५०४,५०५, ५०६,५०९ व ३४ आणि तसेच महिती व तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६ अ व ६६ फ इत्यादी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी.
म्हणून पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. धनंजय सो. यांना लोकशाही युवा फाउंडेशनच्या वतीने निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, प्रदेश प्रवक्ते अँड मोहम्मद तारीख ,सामाजिक कार्यकर्ते हाजी गुलाम रसूल व लोकशाही युवा फाउंडेशनचे शहर कार्याध्यक्ष युनुस शेख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!