अनधिकृतमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड मधील वाकड येथील रूफ टॉप हॉटेल वर हातोडा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २६ मे २०२४ “ड” क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्र २५ मौजे वाकड येथील भुजबळ चौक मधुबन हॉटेल शेजारी रस्त्यालगत असलेल्या दुसऱ्या मजल्यावरील अनधिकृत रूफटॉप स्पाइस फॅक्टरी, अब्सोल्यूट बार्बेक्यू व ९ व्या मजल्यावरील पब्लिक हॉटेल येथे काल दि. २५ मे २०२४ रोजी “ड” क्षेत्रीय कार्यालयामार्फत निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये एकूण अंदाजे ९००० चौ. फुट क्षेत्रफळाचे अनधिकृत रूप स्टॉप पाडण्यात आले आहेत.
सदर कारवाई मा. आयुक्त सो. यांच्या आदेशानुसार व मा. उपायुक्त श्री. लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ड ‘
प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी डॉ. अंकुश जाधव यांच्या अधिपत्याखाली बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भागवानी, उप अभियंता विजय भोजने, कनिष्ठ अभियंता अमोल पडलवार, बिट निरीक्षक सुहास भगत, ओंकार ताटे देशमुख, शेषराव अटकुरे कनिष्ठ अभियंता ‘ड’ क्षेत्रीय अतिक्रमण पथकप्रमुख अमोल शिंदे, एम.एस. एफ जवान- १३ पोलीस उपनिरीक्षक श्री. अँथोनी, पोलीस -४, मजूर -30, गॅस कटर -२, मनपा कर्मचारी व मजूर १५ यांचे उपस्थितीत करण्यात आली. सदरची कारवाई उद्या ही सूरू राहणार आहे असे काल सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!