
प्रतिनिधी अविनाश देशमूख शेवगाव दि. २७ मे २०२४ शेवगाव तालुक्यातील कोळगाव येथील रामदास सुखदेव झिरपे याने गुंतवणूकदारांच्या तगाद्याला वैतागून आज पहाटे घेतला राहत्या घरी गळफास शेअर मार्केटचच्या “UP Stock” च्या ऑफिसला कामाला होता.
याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव तालुक्यातील कोळगांव येथील रहिवासी असलेल्या व काही महिन्यापूर्वी कोट्यावधी रुपयांचा फरार झालेल्या
विठ्ठल ताराचंद झिरपे वय ३० हा भामटा आपल्या U P स्टॉक या बोगस शेअर ट्रेडिंग कंपनीच्या मार्फत शेकडो लोकांना कोट्यवधी रुपयांचा चुना लावून फरार झाला होता. त्याच्या कंपनीमध्ये हा अकाउंटंट आणि कॅशियरचे काम पाहत होता लोक या तरुणाकडे विश्वासाने पैसे देत आणि घेत होते परंतु फरार भामटा बिग बुल विठ्ठल ताराचंद झिरपे हा गाव सोडून परागंदा झाल्याने त्याचा सख्खा चुलत भाऊ असलेल्या रामदास सुखदेव झिरपे वय ३५ याकडे लोकांनी तगादा लावला होता याच्या दारात लोक आमचे पैसे दे तुझ्या भावाला शोधून आण अशा तक्रारी करत होते. या सर्व प्रकाराला वैतागून आज पहाटे दिनांक २७ मे २०२४ रोजी सोमवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपली. शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या व्यवहारांना वैतागून जीव देणारा हा पहिला बळी ठरला. अतिशय हलाकीचे जीवन जगणाऱ्या शोभा तालुक्यातील काही लोकांनी आपल्या आयुष्याची कमाई या भामट्यांच्या हाती केल्याने काहींना आपले जीवन निरर्थक वाटू लागले आहे. या सर्व भीषण परिस्थितीकडे पोलीस प्रशासन आर्थिक गुन्हे शाखा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ई.डी. सप्तवसुली संचालन आर.बी.आय. बघायच्या भूमिकेत दिसत आहे. आतापर्यंत वीस ते पंचवीस शेअर मार्केटचे बिग बुल सुमारे दोन ते अडीच हजार कोटी रुपयांना चुना लावून परागांधा झालेले आहेत त्यांना वेसन कोण घालणार ???
ताजा कलम..
शेवगाव तालुक्यातील दोन ह. भ. प. महाराज सुद्धा शेअर मार्केटचे कोट्यावधी रुपये घेऊन गेल्या आठ पंधरा दिवसापासून फरार असल्याची दबक्या आवाजात चर्चा शेवगाव शिरा सह तालुक्यात सुरू असून या तालुक्यातील अनेक कीर्तनकार प्रवचनकार व भाविक भक्तांना चुना लावल्याची चर्चा आहे. ते दोन महाराज कोण यांनी त्यांच्या त्यांच्या गावात थाटात ऑफिस सुद्धा उघडले होते. गेल्या आठ दिवसापासून ते ऑफिस सुद्धा बंद आहेत. या शेअर मार्केटचे वेड महाराज मंडळींना सुद्धा लागल्यामुळे याबद्दल कुतूहल आणि चर्चा आहे. या शेअर मार्केटच्या घोटाळ्यामुळे शेवगावचे नाव राज्यात नव्हे तर देशात गाजले आहे. आणि अजून काय काय पहायचे बाकी आहे ते परमेश्वरच जाणो. अशी भावना शेवगावकर व्यक्त करत आहेत.

