अभिवादनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
भारताचे माजी पंतप्रधान,भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.२८ मे २०२४ काल २७ मे २०२४ रोजी भारताचे माजी पंतप्रधान,भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस आणि नेहरूनगर येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपायुक्त आण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, अणुविद्युत व दूरसंचार विभागाचे जालिंदर साखरे, श्रीकृष्ण बाबर, दिलीप औटी, बाबुराव टिळेकर तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.




