गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

फिर्यादी यांना टास्क देऊन ०१ कोटी रुपयाची फसवणुक करणा-या आरोपीस सायबर सेलकडुन अटक..

प्रतिनिधी देहुरोड दि. ३० मे २०२४ देहुरोड येथिल महिला व्हॉटसअॅप बघत असतांना तीला पार्टटाईम जॉबसाठी व्हॉटसअॅपव्दारे मेसेज आला होता. फिर्यादी यांना नोकरीची गरज असल्याने त्यांनी कशा संदर्भात नोकरी आहे. त्याबाबत विचारना केली असता आरोपीने त्यांना शेअरचाट व्हिडीओ लाईक आणि शेअर करावे लागतील असे सांगीतले होते. तसेच तीन शेअरचाट व्हिडीओ लाईक केल्यानंतर फिर्यादी यांना १२०/- रु मिळतील असे सांगीतले होते. त्यानंतर अर्जदार यांनी तीन शेअरचाट व्हिडीओ लाईक केले असता अर्जदार यांना १२०/- रु प्राप्त झाले होते. त्यानंतर फिर्यादी यांना प्रिपेड टास्क घेण्यासाठी सांगण्यात आले होते. सुरुवातील फिर्यादी यांना प्रिपेड टास्कसाठी १०००/- रु. भरण्यासाठी सांगण्यात आले होते. त्या बदल्यात फिर्यादी यांना जास्तीत जास्त पैसे मिळतील असे सांगण्यात आले होते. अशा प्रकारे फिर्यादी यांचेकडुन १,०२,८३,६४८/- रु घेऊन फिर्यादी यांना कोणताही परतावा दिला नाही म्हणुन फिर्यादी यांनी देहुरोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं २५२ / २०२४ भादवि कलम ४२०, ४०६, ३४ आय. टी अॅक्ट ६६ (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तांत्रिक तपास सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे व पोशि २३०० कृष्णा गवळी हे करीत होते. त्यांनी तांत्रिक तपास केला असता फिर्यादी यांनी एकुण २० अकाऊंटला पैसे पाठविण्यात आले होते. त्यापैकी इंडसइंड बँकेच्या अकाऊंटला फिर्यादी यांनी ३०००००/- रु भरण्यात आले होते.
सदर अकाऊंट स्टेटमेंटचा तांत्रिक तपास केला असता त्याच्या अकाऊंटला २.५ कोटी रुपयाचे ट्रान्झेक्शन झाले असल्याची माहीती प्राप्त झाली होती. त्यानंतर सदर अकाऊंट धारकाचा शोध घेतला असता त्याचे नाव लक्ष्मण अमृत जगे रा. पौड रोड पिरंगुट या प्रमाणे असुन त्याचा गुन्हयात सहभाग निष्पन्न होत असल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या बँक अकाऊंट विरुध्द भारत भरातुन एकुण ७२ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, मा. वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. संदिप डोईफोडे पोलीस उपआयुक्त, गुन्हे पिंपरी चिंचवड, मा. विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि वैभव शिंगारे, सपोनि प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे, पोशि २३०० कृष्णा गवळी, पोशि बनसोडे (सर्व
नेमणुक सायबर सेल ) यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!