गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

खुनाचा प्रयत्न करून फरार झालेल्या ०३ आरोपींना देहुरोड पोलीसांकडुन अटक..

प्रतिनिधी देहुरोड दि. ३१ मे २०२४ देहुरोड पोलीस स्टेशन गु. रजि.नं. २७९ / २०२४ भा.दं.वि. कलम ३०७, ३२४, ५०४, ५०६, ३४ आर्म अॅक्ट ४ (२५) (२७) अन्वये गुन्हा दाखल होता. गुन्हा घडल्यानंतर एक तासातच आरोपी नामे दिपक दत्तात्रय शेलार, वय ३३ वर्षे रा. देहूगांव, विठ्ठलवाडी, कब्बडी ग्राऊंड शेजारी, पुणे याला पोलीसांनी अटक केली होती. परंतु त्याचे साथीदार गुन्हा केल्यापासुन फरार होते. सदर आरोपींचा शोध घेणे कामी देहूरोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांची एक टिम तयार करण्यात आली होती. त्यांचे तपासामध्ये आरोपी हे अंबरनाथ, कल्याण, ठाणे, घाटकोपर, मुंबई पुणे असे सतत ठाव ठिकाणा बदलुन लपुन राहत होते. त्यामुळे त्यांना पकडणे मुश्कील झाले होते. सदर तपास पथकाने अथक परिश्रम
करून आरोपी यांना देहूगांव येथील विठ्ठलवाडीच्या डोंगराळ भागातुन आरोपी नामे १) कुंदन संदिप थोरात वय २५ वर्षे २) अनिकेत संतोष विटकर वय १९ वर्षे ३) रोहन दुंदा चिमटे वय २१ वर्षे तीघे रा. विठ्ठलवाडी देहुगांव ता. हवेली जि. पुणे ताब्यात घेवुन त्यांना दाखल गुन्ह्यात अटक केली आहे. आरोपींची दिनांक ०१/०७/२०२४ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळवुन देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो, श्री. विनयकुमार चौबे सो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी साो, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ – २ बापू बांगर सो, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, देहुरोड विभाग श्री. घेवारे सो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय वाघमारे, यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार राठोड, पोलीस अंमलदार सुनिल यादव, किशोर परदेशी, प्रशांत पवार, बाळासाहेब विधाते, प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडीक, निलेश जाधव,
मोहसिन आत्तार, युवराज माने, शुभम बावनकर, स्वप्नील साबळे यांनी सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!