महानगरपालिका सेवेतून अधिकारी- कर्मचारी असे एकूण ११९ जण आज सेवानिवृत्त..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दिनांक ३१ मे २०२४ : आज सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा त्यांनी केलेल्या उत्तम कामाचा दाखलाच आहे, असे सांगून सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणे व जबाबदारीने केलेल्या कामकाजामुळे महापालिकेच्या नावलौकिकात वाढ झाली आहे असे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे मे २०२४ अखेर सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचारी अशा एकुण ११९ कर्मचा-यांचा सत्कार अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.
या सत्कार समारंभास सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, बायोकेमिस्ट मीना सोनवणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे तसेच सहकारी चारुशीला जोशी, महादेव बोत्रे, नितीन समगीर, शिवाजी येळवंडे, बालाजी अय्यगार, नथा मातेरे,मंगेश कलापुरे आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.
नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये सह शहर अभियंता राजेंद्र राणे, दंतशल्य चिकित्सक डॉ.यशवंत इंगळे, लेखाधिकारी मनोज भोसले, प्रशासन अधिकारी सविता आगरकर , मुख्याध्यापक संपत पानसरे, सुजाता पानसरे , सुनिता शिंदे, जैबुनिसा शेख , वंदना क्षीरसागर , कल्पना डुंबरे, शांता तापकीर, साहेबराव सुपे, दशरथ कोंडवळे, प्रीती पाटील , छाया शिंदे,करूणा डुंबरे, विजया भोंडवे, लक्ष्मण मोहरे, सुगंधा मेमाणे , नामदेव शेळकंदे, राजेंद्र आहेर , राजश्री सिद्धेश्वर , निशा भाटीया, उपशिक्षक सुलभा बनसोडे, आशा जगदाळे , नानाभाऊ कांडेकर, अंजना ब्राम्हणकर, शाहिन शेख, अंजली काकडे, प्रकाश गायकवाड, प्रमिला कापडणीस , सुभाष कांबळे, साधना माने , उपअभियंता अनिल काशिद, सहाय्यक आरोग्याधिकारी महादेव शिंदे, भांडार अधिकारी मुबारक पानसरे , कार्यालय अधीक्षक शशिकांत चरवड , तुकाराम जाधव, मुख्य लिपिक सुनील काळोखे, उत्तम कांबळे, सुभाष मळेकर, कैलास वाघेरे, सतीश लांडगे, लिपिक विजय भोसले, वाहन चालक शंकर गायकवाड, भानुदास गाढवे, अभिमन्यू सुक्रे, लेखापाल दारासिंग मन्हास, स्टाफ नर्स संगीता साबळे, वर्षाराणी भंडारी , लॅब टेक्निशियन ममता अहलुवालिया , ए.एन.एम आशा खुर्पे, कनिष्ट अभियंता दादासो सूर्यवंशी , सर्व्हेअर राजेंद्र शिंदे, सुतार ठकाराम गवारी, प्लंबर गोविंद मोरे, कनिष्ठ अभियंता जालिंदर काळभोर, वीज ‘पर्यवेक्षक अंबादास फटांगरे, वायरमन राजेंद्र जाधव, दत्तात्रय बांदल, विनोद कुलकर्णी,उद्यान निरीक्षक दत्तात्रय आढळे , मुख्य आरोग्य निरीक्षक वसंत सरोदे, उप अग्निशमन अधिकारी उदय वानखेडे, क्रीडा शिक्षक सुलोचना चौधरी, वायलेस ऑपरेटर बाबुराव टिळेकर , रमेश केसवड, क्रीडा पर्यवेक्षक आत्माराम महाकाळ , वॉर्डबॉय रमेश काटे, पांडुरंग मोरे, मजूर राजू नलावडे, बाजीराव तुरुकमारे, उमेश मुटके, निर्मला शिंदे, अरुण दाभाडे, गणपत येनपुरे, देवीदास परांडे, लालचंद लांडगे, दत्तात्रेय बंडवे, उल्हास मुटके, विठ्ठल बवले, दत्तात्रय देवकर, अंकुश वाघेरे, तानाजी काटे, नंदकुमार येलवंडे, बाळू साळुंखे, दिलीप सोनवणे, सुरेश कामठे, शिपाई अनिल काटे , विठ्ठल झुंजुरके, काळूराम पवळे, तात्यासाहेब बागलाणे, शिवाजी कांबळे, सफाई कामगार रजनी डोळस, पुष्पा रोकडे, ग्रेसमेरी एन्थोनी, गौराप्पा जाधव, साक्राबाई उंप रखवालदार सुरेश मोरे, रोहिदास नेवाळे, कैलास जाधव, बाळासाहेब रणसिंग, मधुकर खराडे, मारुती मारणे, घनश्याम पवार, किरण शिंदे, मुकादम राजू ओव्हाळ, गजानन साखरे, सुनील गायकवाड, आया सुनिता बोरकर, मीना रोकडे, शोभा साठे, गटरकुली साहेबा जावळे, चंद्रकांत तलवार, व्यायामशाळा मदतनीस शाम निंबळे, सुरक्षा सुपरवायझर शिवाजी बेंडाळे यांचा समावेश आहे.
महापालिकेनेही कर्मचाऱ्यांना सेवेत असताना घरकर्जासारख्या अनेक सुविधा दिल्यामुळे कर्मचा-यांची स्वतःची घरी झालेली आहेत, त्यांची मुले-मुलीही देश विदेशात उच्च शिक्षण घेत आहेत, याबाबत समाधान वाटत असल्याचे अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद जगताप यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.