गून्हापोलिसविशेषशहरसामाजिक

सांगवी पोलीस स्टेशन येथील खुनाचे गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १ जून २०२४ दोन दिवसांनपूर्वी दिनांक २९/०५/२०२४ रोजी रात्रौ ०९/४५ वा. चे सुमारास न्यु सिध्देश्वर फॅमिली पान शॉप समोर, इंद्रप्रस्थ सोसायटी, माहेश्वरी चौक, नवी सांगवी, पुणे येथे अमन गिल व त्याचे इतर साथीदारांनी मोटार सायकलवरुन येवुन त्यांचेकडील बंदुकीतून इसम नामे श्री. दिपक दत्तात्रय कदम, रा. आशिर्वाद बिल्डींगचे शेजारी, जयमाला नगर लेन नं.०२, जुनी सांगवी, पुणे याचेवर गोळया झाडुन त्याचा खुन केला.
घटनेबाबत सांगवी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. २३८ / २०२४ भा.दं.वि. कलम ३०२, ३४, आर्म अॅक्ट कलम ३ (२५) (२७), महा. पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर दाखल गुन्ह्यातील आरोपीचा शोध सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस घेत होते. पोलीसांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी नामे अमन राजेंद्र गिल, वय १८ वर्षे, रा. नवी सांगवी, पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याचा दाखल गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास दिनांक ३०/०५/२०२४ रोजी गुन्ह्यात अटक करण्यात आली. आरोपी नामे अमन राजेंद्र गिल याचेकडे सखोल तपास करुन गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे १) सुजल राजेंद्र गिल, वय- १९ वर्षे, रा. नवी सांगवी, पुणे, २) सौरभ गोकुळ घुटे, वय- २२ वर्षे, रा. जुनी सांगवी, पुणे यांना औध परिसरातुन ताब्यात घेतले आहे. त्यांचा गुन्ह्यात सहभाग आढळल्याने दि. ३१/०५/२०२४ रोजी त्यांना गुन्ह्यात अटक केली. सुमारे २० दिवसापुर्वी मृतक दिपक कदम याने आरोपी सुजल गील व अमन गील यास धमकावलेले होते. त्या पुर्व वैमनस्यातुन व सुडाच्या भावनेतुन आरोपींनी दिपक कदम याचा खुन केल्याचे तपासादरम्यान कबुल केले आहे. सदर आरोपीकडे सखोल तपास करुन दाखल गुन्ह्यामध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे. याबाबत पोलीस तपास करत आहे.
मा. कोर्टाने आरोपी नामे अमन राजेंद्र गिल दिनांक ०४/०५/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेला आहे. तसेच इतर दोन आरोपीस उद्या मा. कोर्टात रिमांड कामी हजर केले जाणार आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, मा. श्री वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त, वाहतुक शाखा (अति. कार्यभार परि – १ ), मा. श्री. सचिन हिरे, सहा. पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस स्टेशनचे वपोनि. श्री. महेश बनसोडे, सहा. पोलीस निरीक्षक तानाजी भोगम, पोउनि चक्रधर ताकभाते, पोउनि किरण कणसे, पोलीस अंमलदार पो. हवा ७३९ / प्रकाश शिंदे, ११९४ / विवेक गायकवाड, १५३५ / विजय मोरे, १५१२ / प्रमोद गोडे, ९४८ / विनोद साळवे, १०९३ / राजेंद्र शिरसाट,
८८२ / नितीन काळे, १६८० / विनायक डोळस, पो.ना. १५३४ / प्रविण पाटील, पो.अनं. २२१८ / आकाश खंडागळे, २०११ / विजय पाटील, ३२८० / निलेश शिंगोटे, ३३१४ / राजाराम माने, २२०९/ सुहास डंगारे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!