अपघातमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपवड येथे पूजा हाईटस बिल्डींग मध्ये पहाटे लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यु..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड ३० ऑगस्ट २०२३ पूर्णानगर जून्या RTO शेजारील पूजा हाईटस बिल्डींग मध्ये पहाटे लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यु झाल्याची माहिती मिळताच अवघ्या काही मिनीटातच अग्निशमन दलाची वाहने त्वरीत घटनास्थळी पोहोचली व आगीवर नियंत्रण मिळवले.
या नंतर काही क्षणातच मा.आयुक्त, मा.अतिरिक्त आयुक्त यांनी त्वरित घटनास्थळी भेट दिली व परिस्थितीचा आढावा घेतला तसेच मा.आयुक्त, मा.अतिरिक्त आयुक्त यांनी वायसीएम रूग्णालय येथेही भेट ही दिली.
मयत व्यक्तीचे पोस्ट मार्टम सुरू असून त्यातून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल अशी माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास चिखलीमधील सचिन हार्डवेअरला ही आग लागली होती. याच हार्डवेअरमध्ये हे कुटुंब वास्तव्यास होते. ही आग इतकी भीषण होती की, आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
एकाच कुटुंबातील ४ जणांचा दुर्दैवी मृत्यु सदर कुटुंब हे राजस्थान मधील पाली जिल्ह्यातील आहेत.
१)चिमणाराम बेणाराम चौधरी( पुरुष) वय 48,
२)नम्रता चिमणाराम चौधरी(महिला)वय 40,
३)भावेश चिमणाराम चौधरी (पुरुष मुलगा)वय 15,
४)सचिन चिमणाराम चौधरी(पुरुष मुलगा) वय 13,
सदर माहिती त्यांच्या नातेवाईक यांना विचारपूस करून घेतली आहे. असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!