
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०४ जून २०२४ मावळ लोकसभा निवडणूक मतमोजनीत, शिवसेना (शिंदे गटाचे) उमेदवार श्रीरंग बारणे हे ४४७२८ मतांनी आघाडीवर आहेत. तर शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे) उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे सध्या पिछाडीवर असल्याचे दिसत आहेत.
मावळ लोकसभा मतदार संघ आकडेवारीनुसार, मावळ लोकसभा मतदार संघात श्रीरंग बारणे यांना एकुण २,९९,९६१ मते मिळाली असून ४४ हजार ७२८ मतांनी ते आघाडीवर आहेत. तसेच संजोग वाघेरे पाटील यांना एकुण २,५५,२३३ मते मिळाली आहेत. ते ४४ हजार ७२८ मतांनी पिछाडीवर असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्रात भाजप १३, शिवसेना ०५, राष्ट्रवादी ०१ असे महायुती केवळ १९ जागांवर आघाडीवर आहेत तर काँग्रेस ११, शिवसेना ठाकरे ११, राष्ट्रवादी ०६ असे महाविकास आघाडी ही एकून २८ जागांवर आघाडीवर आहे. तसेच इतर १ आघाडीवर आहे.
देशाचा विचार केला असता सध्या एनडीए २९० जागांवर आघाडीवर आहे तर इंडिया आघाडी २३५ जागांवर आहेत. इतर १८ जागांवर आघाडीवर आहेत.
उत्तर प्रदेश मधे एनडीए ३५, इंडिया आघाडी ४४ असा मोठा धक्का भाजपाला बसलेला दिसत आहे.