प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक दि. ०५ जून २०२४ जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिरवांकुर फाउंडेशनतर्फे आज जिल्हा न्यायालयाच्या आवारात अतिरिक्त सत्र न्यायाधीश जेवने, श्रीमती घुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जेष्ठ वकील अविनाश भिडे, अँड.मंत्री, गौरवी पर्वते, सुरज चव्हाण, महानगरपालिकेचे उद्यान विभाग प्रमुख श्री.भदाणे, हिरवाकुंरचे अध्यक्ष निलय शहा आदी उपस्थित होते.
हिरवांकुर फाउंडेनशतर्फे जिल्हा न्यायालय आवारात वृक्षारोपण. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्यः वृक्ष दत्तक अभियानाची अनोखी सुरवात
नाशिक- ग्लोबल वॉर्मिंगच्या या जमान्यात पृथ्वीवर हवेतील कार्बनडाय ऑक्साईड शोषून जीवनावश्यक प्राणीमात्राला अगदी निःशुल्क प्राणवायु फक्त वृक्षच उपलब्ध करून देतात, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” असे संत ज्ञानेश्वर यांनी म्हटले आहे. हवेतील प्राणवायुचे पुनर्भरण करण्याची आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. हेच लक्षात घेऊन जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आज हिरवाकुंर फाउंडेशनतर्फे जिल्हा न्यायालयाच्या आवारात वृक्षारोपण करत या अनोख्या वृक्ष दत्तक अभियानाची सुरवात करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयाच्या आवारात जेष्ठ वकीलांच्या हस्ते वर्षाला किमान २५ वृक्षांचे रोपण करून त्यांचे योग्यपध्दतीने संगोपन, संबंधीत जेष्ठ वकीलांना संगोपनाची जबाबदारी देण्याचे नियोजन आहे. या अनोख्या अभियानामागे जेष्ठ विधीज्ञ अविनाश भिडे यांची ही संकल्पना आहे. त्यासाठी हिरवाकुंर फाउंडेशनची साथ लाभत आहे. या अभियानांतर्गत वकिलांच्या हस्ते दुर्मिळ औषधी वृक्षांचे वृक्षारोपण केले जाणार आहे.
अनोख्या उपक्रमाची सुरवात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज जिल्हा न्यायालयात परिसरात सकाळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश जेवने, श्रीमती घुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जेष्ठ वकील अविनाश भिडे, अँड.मंत्री, गौरवी पर्वते, सुरज चव्हाण, नाशिक महानगरपालिकेचे उद्यान विभाग प्रमुख श्री.भदाणे, हिरवाकुंरचे अध्यक्ष निलय शहा आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी या अनोख्या उपक्रमास शुभेच्छा देत जास्तीत जास्त वकील, कर्मचारी यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
गेल्या तीन वर्षापासून या संस्थेने नाशिक व इतर सहा जिल्ह्यांमध्ये असंख्य औषधी वनस्पती व वृक्षांचे रोपण व त्याविषयी जनजागृती निःशुल्क केलेली आहे. याशिवाय अनेक व्यक्ती, संस्था व विद्यार्थी यांनाही प्रेरित केले आहे. यापुर्वी सुध्दा न्यायालयाच्या परवानगीने गेल्या वर्षी १५ ऑगस्ट २०२३ व २६ जानेवारी २०२४ ला न्यायालयातील न्यायाधीश, वकील व कर्मचारी यांनी स्वच्छेने वृक्ष दत्तक घेऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.