महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.९ जून २०२४ महाराणा प्रतापसिंह हे मातृभूमीवर निस्सीम प्रेम करणारे,प्रखर देशभक्त आणि पराक्रमी राजे होते, त्यांच्या देशभक्तीचा वारसा भावी पिढीने जोपासावा असे मत अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस आणि निगडी येथील त्यांच्या महाराणा प्रतापसिंह उद्यानातील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास माजी महापौर कविचंद भाट,माजी नगरसदस्य सचिन चिखले, प्रा.उत्तम केंदळे, माजी नगरसदस्या सुमन पवळे, कमल घोलप,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार सिंह बायस, महेंद्रकुमार परिहार,कैलास सिंह चौहान,निवृत्ती राजपूत, शैलेद्र सिंह,मुकेश राणा, जितेंद्र सिंह,ओम शंकर सिंह,नागेंद्र सिंह,धनंजय इंगळे,महिला सामाजिक कार्यकर्त्या प्रिती सिंह, बिंदू राठोड,रश्मी सिंह,सीमा सिंह तसेच नागरिक उपस्थित होते.
महाराणा प्रतापसिंह यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते.