विसाच्या ‘रॅली ऑफ महाराष्ट्र` छायाचित्र स्पर्धेत लोकमतचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे प्रथम..
प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक दि. ०९ जून २०२४ विसाच्या `ब्लु बॅड स्पोर्टस् आयएनआरसी २०२४ रॅली ऑफ महाराष्ट्र` निमित्ताने घेण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेतील विजेते प्रशांत खरोटे, पंकज चांडोले, शैलेंद्र साळी यांच्यासमवेत विसाचे अध्यक्ष अश्वीन पंडित, श्रीरंग मत्से, दिनेश शुक्ल, श्रेयस यंदे, मनोज जोशी, पवन दर्यांनी, श्रीकृष्ण कुलकर्णी आदी.
विसाच्या रॅली ऑफ महाराष्ट्र
छायाचित्र स्पर्धेत प्रशांत खरोटे प्रथम नाशिक वेस्टर्न इंडिया स्पोर्टस् असोसिएशन (विसा) तर्फे ३१ मे ते २ जून या कालावधीत नाशिकसह त्र्यंबकेश्वर, मोखाडा, पालघर परिसरात ब्लु बॅड स्पोर्टस् आयएनआरसी २०२४ रॅली ऑफ महाराष्ट्र ही रॅली घेण्यात आली. या स्पर्धेच्या निमित्ताने वर्तमानपत्राच्या छायाचित्रकारांसाठी स्पर्धा ठेवण्यात आली होती, त्यात लोकमत
चे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांना प्रथम पारितोषिक मिळाले.
या स्पर्धेत महाराष्ट्र टाइम्स
चे छायाचित्रकार पंकज चांडोले यांना द्वितीय तर लोकनामा
चे छायाचित्रकार शैलेंद्र साळी यांना तृतीय क्रमांक मिळाला. रॅलीच्या या तीन दिवसात विविध वर्तमानपत्राच्या छायाचित्रकारांनी रॅलीचा थरार हा आपल्या कॅमेऱ्यामध्ये बंदिस्त करत वर्तमानपत्रातून अशा छायाचित्रांना ठळक प्रसिध्दी दिली. श्री. श्रीकांत व सौ. दिपाली नागरे यांनी या छायाचित्र स्पर्धेचे परिक्षण केले. विसाचे अध्यक्ष अश्विन पंडित, श्रीरंग मत्से यांच्याहस्ते आज विसाच्या कार्यालयात श्री.खरोटे, चांडोले, साळी यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विसाचे दिनेश शुक्ल, श्रेयस यंदे, मनोज जोशी, शिल्पा भेंडे, हिरामण ढेरींगे, पवन दर्यानी, श्रीकृष्ण कुलकर्णी आदी उपस्थित होते.