पोलिसमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड ‘आरटीओ’ पदी संदेश चव्हाण तर, राहुल जाधव ‘डेप्युटी आरटीओ’….

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ जून २०२४ पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाला तब्बल एक वर्षाने प्रादेशिक परिवहन अधिकारी मिळाले आहेत. मुंबई (पूर्व) येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले संदेश चव्हाण यांची पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. याबाबतचा गुरुवारी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी आदेश काढले.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत १९८३ मध्ये पिंपरी- चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन केले होते. या कार्यालयाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहर, भोर, वेल्हे, जुन्नर, मंचर या तालुक्यांचा समावेश होता. पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा देण्याची मागणी होती. अखेर २३ जून २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा दिला होता; तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांना प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून तात्पुरता कार्यभार दिला होता. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्या होत्या.
गृहविभागाचे आदेश गुरुवारी गृहविभागाने परिवहन विभागातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पद्दोन्नतीचे आदेश काढले आहेत. पिंपरी चिंचवड आरटीओत संदेश चव्हाण यांची आरटीओ आणि राहुल जाधव यांची डेप्युटी आरटीओ म्हणून पदोन्नती झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!