दू:खद वार्तामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे सेक्रेटरी ” संजयजी बोरा ” यांचे आज सकाळी निधन झाले आहे.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १० जून २०२४ संजयजी बोरा त्यांना आज सकाळी छाती मध्ये दुखत असल्याने सुरुवातीस आनंद हॉस्पिटल येथे ऍडमिट केले त्यानंतर यशवंत राव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी आणले मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे संततूकाराम नगर येथील मनपाच्या (YCM) यशवंराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टरनी घोषित केले.
ज्येष्ठ पत्रकार संजयजी बोरा यांचे आज सकाळी ०८.३० च्या दरम्यान हार्ट अटॅक ने निधन झाले.

त्यांच्या मागे पत्नी तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. संजयजी बोरा हे पिंपरी चिंचवड शहर पत्रकर संघाचे सेक्रेटरी होते अगदी मृदभाषी प्रेमळ व सर्वांना मदत करणारे असे होते. त्यांच्या अकस्मित जाण्याने सर्व पत्रकारांना मोठा धक्का बसला आहे.

त्यांचा अंतविधी आज सांयकाळी ४ वाजता भोसरी स्मशानभूमीत पार पडणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!