महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

आम आदमी पार्टीचे वहाबभाई शेख यांचा आमदार श्री.रविंद्र धगेकर यांच्या हस्ते काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश..

प्रतिनिधी मनिषा पवार दि. १२ जानेवारी २०२४ दोन दिवसांन पूर्वी दि. १० जानेवारी रोजी, बुधवारी सायंकाळी आम आदमी पार्टीचे पुणे जिल्ह्यातिल एकमेव अल्पसंख्याक चेहरा व आम आदमी पार्टी, सामाजिक न्यायविंग पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. वहाबभाई शेख यांनी कसबा विधानसभाचे काँग्रेस पक्षाचे नव निर्वाचित, लोकप्रिय आमदार श्री. रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते व काँग्रेसचे पिंपरी चिंचवड़ शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या आणि बाकी शहर पदधिकार्यांच्या उपस्थितिमधे काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी श्री. वहाबभाई शेख यांच्यासोबत आम आदमी पक्षाचे माजी शहरअध्यक्ष अनुप शर्मा, उपाध्यक्ष महेश बिराजदार-पाटील, महिला उपाध्यक्ष सिमाताई यादव, मैमुना शेख, मेहनाज मोमिन, सामाजिक न्याय विभाग pcmc शहर अध्यक्ष दीपक श्रीवास्तव, सचिव सतीश नायर, सहसचिव अजय गायकवाड, पिंपरी विधानसभा अध्यक्ष मुकेश जाधव, उपाध्यक्ष जावेद शेख, ST आघाडी अध्यक्ष संतोष बघाव, चिंचवड़ विधानसभा अध्यक्ष विष्णु पाटील, सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा सचिव सद्दाम पठान, यांच्यासह शहरातील पक्षाच्या आजी-माजी ५० कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!