पिंपरी विधानसभेसाठी देवेंद्र तायडे आणि मयूर जाधव यांना उमेदवारी द्यावी. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी
पिंपरी चिंचवड दि. १२ जून २०२४ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष पंडीतराव कांबळे यांच्या उपस्थितीत पिंपरीच्या पक्ष कार्यालयामध्ये बैठक पार पडली.
यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या संघटनात्मक बांधणी संदर्भात आणि लोकसभा आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरात आल्याबरोबर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक, पिंपरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.
या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पिंपरी विधानसभा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा आणि पक्षामार्फत देवेंद्र तायडे किंवा मयूर जाधव यांना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांसमोर मागणी केली. पिंपरी चिंचवड शहरात पक्ष संघटनेत काम करणाऱ्या आणि शरद पवार साहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळायला हवी अशी भावना व्यक्त होत आहे
पूर्वी वंचित बहुजन आघाडीमध्ये काम केलेले देवेंद्र तायडे हे सध्या पिंपरी चिंचवड शहरातील पक्षाचे कार्याध्यक्ष असून, पक्ष फूटीनंतर खंबीरपणे आदरणीय शरद पवार साहेबांची साथ देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एक सुशिक्षित आणि संयमी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आगामी काळात पक्षाने त्यांना संधी दिल्यास पक्षाला निश्चितच फायदा होईल असे सांगण्यात येते.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष असणारे मयूर जाधव हे पक्षातील एक तरुण आणि उच्चशिक्षित चेहरा असून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून त्यांनी शहरात भरीव कामगिरी केली आहे. पक्ष संघटनेत प्रदेश सरचिटणीस म्हणूनही काम पाहिलेले मयूर जाधव यांनी शरद पवार आणि त्यांच्या विचारधारेसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि लोकसभेत त्याची चुणूकही दाखवून दिली. उच्चशिक्षित चेहरा, मतदारांशी असणारा संपर्क या मयूर जाधव यांच्या जमेच्या बाजू आहेत.
प्रदेशाध्यक्ष पंडित कांबळे यांनी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मत जाणून पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा महविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे कसा राहील याबाबत आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. तसेच देवेंद्र तायडे आणि मयूर जाधव यांच्या नावाची शिफारस पक्ष नेतृत्वाला केली जाईल असे सांगितले.
आगामी काळात विधासभेसाठी पक्षाचा उमेदवार कोणीही असला तरी आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचाराचाच उमेदवार पिंपरी विधानसभेत विजयी होणार असा विश्र्वास सर्वांच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
यावेळी संघटित कामगारचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष संजय गायकवाड, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, सरचिटणीस के. डी. वाघमारे, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, महिला चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष कविता कोंडे, संघटक विवेक विधाते, संदीप गायकवाड, सचिन सकाटे, सूरज देविकिरी, विकास रंधवे, जे. आर. कुंभारे, राजेंद्र कडू, आकाश शिंदे, राजाभाऊ निमसे, रमेश उपार, पांडुरंग विर, आजिनाथ सकट, सलीम डांगे, सुनील कांबळे, रवी पवार, रोहित जाधव, अविनाश कांबळे आदी उपस्थित होते.