आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण दिन साजरा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ जून २०२४ जागतिक पर्यावरण दिनानिम्मित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. बिजलीनगर, एमआयडीसी, कर्मचारी वसतिगृह या ठिकाणी 100 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कनिष्ठ अभियंता विशाल पवार यांनी असे मत व्यक्त केले की पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण सारखे उपक्रम हाती घेणे काळाची गरज आहे.
तसेच रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामा भोरखडे यांनी असे मत व्यक्त केले विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.
यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री संजय कोतवाल साहेब, उपअभियंता श्री कवटगी साहेब, कनिष्ठ अभियंता श्री. विशाल पवार तसेच रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. रामा भोरखडे, सचिव सिद्धी कुंभार, खजिनदार निलेश पवार, निलेश नलावडे साहेब, अमर पवार साहेब, रिद्धी जाधव, प्रणिता खंदारे, शुभांगी पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!