आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

धावडे वस्ती, भोसरी येथील कॉलरा आजाराच्या उद्रेक व पालिकेच्या उपाय योजना – डॉ. लक्ष्मण गोफणे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १७ जून २०२४ धावडे वस्ती, भोसरी येथील कॉलरा आजाराच्या उद्रेक झाला होता. त्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत उपाय योजना करण्यात आल्या होत्या.
या संदर्भातील रुग्णांबाबतची माहिती
दि. ०८/०६/२०२४ : पहिला रुग्ण आढळून आला. दि. ११/०६/२०२४ सर्वेक्षणानंतर २ अजून रुग्ण आढळून आले. दि. १४/०६/२०२४ सायंकाळी चार नवीन रुग्णांची नोंद. दि. १७/०६/२०२४ तीन नवीन रुग्णांची नोंद झालेली आहे. सर्व रुग्णांवर पिंपरी चिंचवड मनपाच्या विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
आजची रुग्णस्थिती
आज दि. १७ ०६ २०२४ अखेरची रुग्णसंख्या तपासणी उपचार १० कॉलरा-कल्चर पॉझिटिक् ६ रुग्ण वायसीएम येथे व ४ रुग्ण नवीन भोसरी रुग्णालय येथे दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. वैद्यकीय विभागामार्फत केलेल्या आणि सुरु असलेल्या कार्यवाहीची माहिती वैद्यकीय विभाग व पाणीपुरवठा विभागामार्फत या भागामध्ये संयुक्त सर्वेक्षण करण्यात आले व दुषित पाईपलाईनचा शोध घेऊन तात्काळ ११/०६/२०२४ रोजी बंद करण्यात आलेली आहे.
फिल्ड कर्मचाऱ्यांमार्फत घरोघर संशयित रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. नवीन भोसरी रुग्णालयाच्या अंतर्गत असलेल्या धावडे वस्ती परिसरामध्ये पहिला रुग्ण आढळून आल्याच्या दिनांकापासून फिल्ड कर्मचाऱ्यांमार्फत घरोघर सर्वेक्षण सुरु करण्यात आलेले आहे. २ सदस्य असलेल्या एकूण ४४ टीम्स मार्फत आज अखेर १४, १६१ घरे व ३९, ४९२ इतक्या नागरिकांचे करण्यात आलेले आहे व दैनंदिन सुरु राहणार आहे.
या सर्वेक्षणामध्ये सौम्प लक्षणे असलेले १३३ रुग्ण आढळून आले व त्यांना तत्काळ उपचार देण्यात आले. संशयित असलेले रुग्ण सापडताच लागलीच त्यांचे विष्ठा नमुने वायसीएम रुग्णालय येथे पाठविण्यात येत आहेत. सर्व घरांमध्ये जलसंजीवनीच्या (ORS) पाकीटांचे वाटप करण्यात आलेले आहे. रुग्णांच्या सहवासितांना खबरदारी म्हणून Chemoprophylaxis करिता Cap Doxycycline 100 mg आणि Cap Omez याचे वाटप करण्यात आलेले आहे.
पाणी तपासणी कार्यवाही
वैद्यकीय विभाग व पाणीपुरवठा विभाग यांच्या संयुक्त सर्वेक्षणामध्ये फिल्डवर पाण्याच्या ओटी
(Orthotolidine Test) करण्यात आली आहे
रुग्णाच्या वापरातील पाण्याचे नमुने मनपाची प्रयोगशाळा व राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे Microbiological तपासणी साठी पाठविण्यात आलेले आहेत.
भैरवनाथ शाळा, धावडे वस्ती फिल्ड दवाखाना स्थापना भैरवनाथ शाळा, धावडे वस्ती येथे फिल्ड दवाखाना ओपीडी सुरु करण्यात आली आहे. संशयित रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यात येत आहेत. आवश्यकता असल्यास रुग्णांना नवीन भोसरी रुग्णालय येथे संदर्भित करण्यात येत आहे. वैद्यकीय विभागामार्फत धावडे वस्ती परिसरामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी याकरिता रिक्षाद्वारे जागृतीपर माईकिंग करण्यात येत आहे.
वैद्यकीय विभागामार्फत सर्वेक्षणामध्ये देण्यात आलेली माहिती व आवाहन
पाणी उकळून व थंड करून पिण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. जुलाब/उलटी आजाराचे रुग्ण असल्यास तत्काळ मनपाचे कर्मचारी यांना संपर्क करण्याचे आवाहन केले जात आहे. बोअरवेल, शुद्धीकरण न केलेल्या विहिरी अथवा इतर पाणीसाठ्या मधुन पाण्याचा वापर ना करणे शिळे किंवा उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत व अन्नपदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत नागरिकांनी स्वच्छतेचे पालन करावे व शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत
नागरिकांनी घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा.
नागरिकांना घरोघरी जनजागृतीपर हस्तपत्रिकांचे वाटप सुरु करण्यात आलेले आहे. धावडेवस्ती परिसरामध्ये पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये जलजन्य आजार व त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. परिसरातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची सभा घेण्यात आलेली असून त्यांना असे रुग्ण आढळल्यास तत्काळ मनपास कळविण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे.’
मनपाच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय करण्यात आलेली आहे. मनापामार्फत धावडे वस्ती परिसरातील सर्व घरांना टँकरद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत आहे. असे माहिती पत्रकाद्वारे आरोग्य वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!