कलामहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

भोसला कॉलेजमध्ये विद्यापीठाच्या स्कूल कनेक्ट अभिय़ानांद्वारे बारावीनंतरचे विद्यार्थी-पालक यांच्याशी नव्या शैक्षणिक धोरणावर संवाद साधतांना डॉ. सुनिल जोशी

नव्या शैक्षणिक धोरणामुळे विकासाबरोबरच करिअरची अधिक संधी डॉ. सुनिल जोशी

स्कूल कनेक्ट अभियानांद्वारे विद्यार्थी-पालकांशी साधला संवाद

प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक दि. २० जून २०२४ नव्या शैक्षणिक धोरणात सर्वांना समान शिक्षण, समानता, गुणवत्ता, परवडणारे शिक्षण आणि उत्तरदायित्व या पाच स्तंभाचा विचार केला आहे. शिक्षण धोरणात अत्यंत व्यापक दृष्टिकोन राखण्यात आला. आपली संस्कृती आणि उद्याचे भविष्य यांचा संगम घालण्याचा प्रयत्न आहे. असे प्रतिपादन जेष्ठ अभ्यासक डॉ.सुनिल जोशी यांनी केले. शिक्षण आनंददायी करण्याबरोबर ते जीवनाभिमुख आणि अधिक रोजगाराभिमुख करण्यावर भर देण्यात आला आहे. धोरण सशक्त आणि समर्थ शिक्षण व्यवस्था उभी करणारे आहे. असेही ते म्हणाले.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संद्भात जागृती करण्यासाठी बारावीनंतरचे विद्यार्थी व पालक यांच्यासाठी स्कूल कनेक्ट हे अभियान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये डॉ.जोशी यांचे नव्याने प्रवेश घेणाऱ्यांना नव्या शैक्षणिक अभ्यासक्रमाची (एनईपी) माहिती देणारे हे व्याख्यान झाले. प्राचार्य डॉ. दिनेश नाईक, या उपक्रमांचे समन्वयक उपप्राचार्य डॉ.राजेंद्र पाटील हे उपस्थित होते. सेमिनारमध्ये झालेल्या या व्याख्यानात विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते, १६० विद्यार्थ्यांनी आपला ऑनलाईन सहभाग नोंदवला. डॉ.जोशी यांनी नव्या शैक्षणिक धोरणाचे विविध टप्पे विषद केले. ते म्हणाले विद्यार्थ्यांला केवळ शिक्षण मिळणे हे पुरेसे नाही तर त्याला नोकरी, व्यवसायाच्यादृष्टीने उपयुक्त ठरेल अशापध्दतीची रचना नव्या शौक्षणिक धोरणात आहे. व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमास गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाईल. हे खरं असलेतरी त्याच्यासमोर अनेक विषय,शाखांचे पर्याय उपलब्ध असतील. पदवीसाठी बहुविध विषयांचा एकात्मिक अभ्यासक्रमाच विचार करण्यात आलेला आहे. त्याकरिता चार वर्षांचा कालखंड निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे चांगले शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यास मदत होणार आहे. प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र, पदविका अथवा पदवी मिळणार आहे. त्यामुळे शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर एखादा विद्यार्थी पडला तरी त्याचे ते वर्ष वाया जाणार नाही. त्याचबरोबर या स्तरावर क्रेडिट गुणांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ते सुध्दा आपल्याला प्राप्त करता येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थी-पालकांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!