
प्रतिनिधी सतिश वि.पाटील मुलुंड, मुंबई दि. २८ जानेवारी २०२५ वाडा, डाकिवली गाव श्री. संतोषी माता मंदीर ट्रस्ट मुलुंड, मुंबई यांच्या सौजन्याने गरजवंत महीलांना ३०० साडी चोळी वाटप तसेच २०० शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य व गोष्टीची पुस्तके वाटप करण्यात आले. डाकीवली जिल्हा परिषद शाळा जि. पालघर शाळेपासूनच संच देण्यात आला. यावेळी श्री. संतोषी माता ट्रस्ट मुलुंड मुंबईचे अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाची कल्पना पंडित पवार यांची होती आपण ज्या गावात व शाळेत शिक्षण घेतले त्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली असे त्यांनी मनोगतात व्यक्त केले. तसेच पाहुणे म्हणून अनुवाद आपला न्युजचे पत्रकार सतिश वि.पाटील हे उपस्थित होते. गावातील सर्व मान्यवर व शाळेतील शिक्षक उपस्थित होते सर्वांच्या हस्ते साडी, चोळी व शालेय साहित्य वाटप करण्याचा मान देण्यात आला.



