आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सार्वजनीक स्वच्छतागृह उभारा..

पालिका प्रशासन जानूनबूजून महिलांना करतय अपमानित कित्येक वर्षापासून सार्वजनीक स्वच्छतागृह नसल्याने महिलांना पालिकाभवनाचा घ्यावा लागतो आश्रय..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २६ एप्रिल २०२५ राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुनिल मल्हारी कांबळे पिंपरी चिंचवड शहर यांनी दि. ०१ एप्रिल २०२५ रोजी पालिका प्रशासनास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सार्वजनीक स्वच्छतागृह उभारा यासंदर्भात निवेदन दिले होते.
यात त्यांनी नमूद केले आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अगदी शेजारीच असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व भीमसृष्टी हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा चौक आहे. येथे विविध पक्ष, पाट्री, संघटनेंचे आंदोलन होत असतात. तसेच भीमसृष्टी येथे दररोज शेकडो बांधव भगीनी लहान मूलांन सोबत बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता येत असतात यात मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग असतो तसेच, या चौकात पि.एम.पि.एल व रिक्षाचा थांबा असल्याने तसा हा चौक अती वर्दळीचा आहे तरी सार्वजनिक स्वच्छतागृहाची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे विशेषतः महिला वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने तसेच नागरीकांच्या सोयीसाठी या ठिकाणी त्वरित सार्वजनिक स्वच्छतागृहची उभारणी करावी, अशी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुनिल मल्हारी कांबळे यांनी यासंदर्भात निवेदनातून विनंती केली आहे. सार्वजनिक सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महिला व लहान मुलींसाठी ही समस्या अधिक गंभीर आहे.
तरी आपण या विषयावर तातडीने लक्ष घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे स्वच्छ आणि सुरक्षित सार्वजनिक स्वच्छतागृहाची लवकरात लवकर उभारण्याची कार्यवाही करावी, अशी आग्रहाची विनंती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!