प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक दि. २१ जून २०२४ भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्राचार्य डॉ.दिनेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली योगासन व कवायतीचे आयोजन या वेळी शिशु विहार बालकमंदीर मराठी माध्यम शाळेत सुर्यनमस्काराचे प्रात्याक्षिक सादर करण्यात आले. तसेच भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्समध्ये विद्यार्थींनीनी योगसाधनेतून सांघिकतेचे दर्शन घडवले
योगासने, कवायतींनी फुलला भोसला कॅम्पसचा परिसर
नाशिक सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा-महाविद्यालयांमध्ये जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योगासन, प्राणायम करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवत आजच्या धकाधकीच्या जीवनात योगासन, कवायत किती महत्वाचे आहे. याबाबतच्या महत्वाच्या टिप्स दिल्या.
भोसला कॅम्पसमधील विविध शाळा-महाविद्यालयामध्ये अगदी पहाटेपासूनच उत्साह दिसला. भोसला मिलिटरी कॉलेजच्या प्रांगणात योगशिक्षक व प्राचार्य डॉ. दिनेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आसने करण्यात आली. सुरवातीला प्राचार्य डॉ. नाईक यांनी जीवनात योगासन, कवायत किती महत्वाचे आहे, आज तुम्हाला कुठल्याही आजाराविना जगायचे असेल तर योगासन, कवायत, शारीरीक श्रम, कसरती खूप महत्वाच्या असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी विविध प्रकाराचे प्रात्याक्षिक दाखवले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, शिक्षकांनी त्याप्रमाणे कृती केली.
शिशु विहार बालक मंदीरात अनोखा उत्साह, शिशुविहार व बालक मंदीर मध्ये (इ. १ली ते इ. ७ वी मराठी माध्यम) या विभागात योगदिनानिमित्त अनोखा उत्साह पहायला मिळाला. सौ. कविता क्षत्रिय यांनी योगाचे महत्त्व, योगाचे फायदे आणि आसनांचे प्रकार, दैनंदिन जीवनात योगाचे उपयोग, योगाचे मूळ व आहार विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. क्रीडाशिक्षिका सौ. शैलजा पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांकडून विविध योगप्रकार व आसने यांची अतिशय सुंदर व शिस्तबद्ध पद्धतीने प्रात्यक्षिके करून घेतली. त्यात सूर्यनमस्कार, पूरक हालचाली, पद्मासन, वज्रासन, ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, प्राणायाम, ध्यान यांचा समावेश होता. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ. नीता पाटील यांचेसह सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. उपक्रमास शालेय समिती अध्यक्षा मा.सौ. सुवर्णा दाबक यांचे मार्गदर्शन मिळाले.
भोसला मिलीटरी स्कूल गर्ल्समध्ये सांघिकतेचे दर्शन
शाळेच्या समादेशिका मेजर सपना शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली योगदिन साजरा झाला. विद्यार्थीनीनी वेगवेगळी योगासने सादर करत सांघिकतेचे दर्शन घडवले. त्यात ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन पादहस्तासन, भद्रासन, वज्रासन, उष्ट्रासन, शशांक आसन, भुजंगासन शलभासन, मकरासन, उत्तनपादासन, पवन मुक्तासन, शवासन यांचा समावेश होता. विद्यार्थींनींना अनुलोम-विलोम, संथ श्वसन, दीर्घ श्वसन, प्राणायामचे महत्व सांगण्यात आले. या योगसाधनेत मुख्याध्यापिका वैशाली कुलकर्णी, योग शिक्षिका स्वाती मुळे तसेच सर्व कर्मचारी व विद्यार्थीनीनी सहभाग घेतला.