गोरगरीब-गरजून साठी नगरसेवकाचा लढा… SRA च्या प्रकल्पात विशिष्ठ लोक घालतात खोडा…
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २६ जून २०२४ विठ्ठलनगर येथील सुज्ञ नागरिकांना आवाहन करण्यात येते कि विठ्ठलनगरमधील गोरगरीब -गरजू नागरिकांसाठी त्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून SRA प्रकल्प राबविण्यात येणार आहे. असे मा. नगरसेवक राहूल भोसले युवामंचच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगीतले.
पूढे ते बोलले की आम्ही अनेक अडचणीवर मात करत हा प्रकल्प आपल्या गोरगरीब नागरिकांसाठी मंजूर करून आणला आहे, पण आपल्यातीलच काही विशिष्ठ लोक मात्र या प्रकल्पाच्या बाबतीत वारंवार दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असून, विठ्ठलनगर मधील सुज्ञ नागरिकांनी या व अशा दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींपासून सावध रहावे, असे आपणास आवाहन करण्यात येत आहे.
ज्या जागेवर पत्राशेडचे काम सूरू आहे, ती जागा HA कंपनीकडून रीतसर भाडेतत्वावर घेण्यात आली असून तिथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम नाल्यावर केले जात नाही अथवा कोणतेही अतिक्रमण केले जात नाही, पण मुद्दामहून काही व्यक्तींकडून या गोरगरिबांच्या प्रकल्पाबाबतीत समाजमाध्यमांवर वारंवार गैरसमज पसरविण्याचे काम केले जात असून, कदाचित गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळूच नये अशी त्यांची धारणा असावी.
पुन्हा एकदा सर्वांना आश्वासित करण्यात येते कि सर्व नागरिकांना पात्र -अपात्र असा कोणताही मुद्दा न घेता सर्वांना पात्र करून प्रत्येक समाविष्ठ नागरिकास हक्काच्या घरासाठी कुठेही एक रुपयाही भरावा लागणार नाही.
सोबत बुद्ध विहार, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, मस्जिद, व वाल्मिकी मंदिर या सर्व प्रार्थना स्थळांचा जागेवरच विकास करण्यात येईल.
तरी आपण मात्र दिशाभूल करणाऱ्या व्यक्तीपासून सावध असावे, असे आपणास विनम्र आवाहन करण्यात येत आहे. असे मा. नगरसेवक राहूल भोसले युवामंचच्या वतीने सांगण्यात आले.