छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी (अ.प.) पक्षाच्या वतिने अभिवादन..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड बुधवार दिनांक २६ जून २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय खराळवाडी, पिंपरी येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करून करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे अभिवादन करतांना म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज ही अशी व्यक्ती होती की ज्यांनी राजा असूनही दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून त्यांच्याशी सदैव जवळीक ठेवली. समाजा समाजामध्ये जातीभेदाच्या भिंती पाडण्यासाठी शाहू महाराजांनी निरनिराळे प्रयत्न केले. राजर्षी शाहू महाराज स्वतः कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानत नव्हते. शिक्षण, सामाजिक प्रबोधन, सर्वसामान्य माणसांचा विचार करणारा राजा, पुरोगामी विचार जोपासणारा राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचे भारताच्या इतिहासामध्ये खूप मोठे स्थान आहे, अशा या राजाला त्यांच्या जयंतिनिमित्त माझे कोटी कोटी प्रणाम करून विनम्र अभिवादन करतो.
यावेळी माजी नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे आपल्या भाषणात म्हणाले की, छत्रपती शाहू महाराज यांनी आपले आयुष्य सामाजिक न्यायासाठी वाहिले, समाजामध्ये असणारी असमानता यामध्ये समानता आणण्यासाठी त्यांनी काम केले.
यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, मा.नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे, सतिष दरेकर, नारायण बहिरवाडे, प्रकाश सोमवंशी, संजय नेवाळे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, सामाजिक न्याय अध्यक्ष संजय औसरमल, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, उद्योग व व्यापार सेल अध्यक्ष श्रीकांत कदम, तुकाराम बजबळकर, बापू सोनवणे, कुमार कांबळे, मिरा कांबळे, वसंत राक्षे, दत्ता जैद, बाळासाहेब मोरे, रविंद्र सोनवणे, ॲड.किंचक सरवदे, नितीन सुर्यवंशी, चिन्मय कदम, धनाजी तांबे, सुनिल अडागळे, इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.