प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक दि. २५ जून २०२४ साधारणता चार दिवसांन पूर्वी म्हणजे दि. २१ जुन २०२४ रोजी ओझर पोलिस स्टेशन मध्ये पोलिस खात्याकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल करतांना संबंधित विषयाची कुठली हि चौकशी न करता तसेच कुठलीही शहानिशा न करता हा गुन्हा दाखल केला गेला. सदर विषय हा सौ. स्वाती युवराज बंदरे राहणार ओझर मिग ता. निफाड, जि. नाशिक या श्री. सेवा हॉस्पिटल बाजारपेठ ओझर मिग येथे दि.१९/०१/२०२४ रोजी आपल्या मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झाल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून शस्त्रक्रियेसाठी रु.६५०००/- खर्च येईल असे सांगण्यात आले परंतु त्यांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर अवलंबून असून सततच्या नापीकीमुळे त्यांची परिस्तिथी हालाकीची असल्याने त्यांनी हॉस्पिटलच्या माध्यमातून शस्त्रक्रियेसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना याठिकाणी अर्ज केले.
दि. ०५/०२/२०२४ रोजी सदर रुग्णास मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून उपचारासाठी रु.१०००००/- (एक लाख रुपये) चे अर्थसहाय्य मंजुर झाले परंतु डीस्चार्जच्या वेळी दिनांक.०६/०२/२०२४ रोजी सबंधित डॉक्टरने आपले अर्थसहाय्य मंजुर झालेले नसुन आपल्या उपचारासाठी लागलेला खर्च रु.६५०००/- आपण भरावा असे सांगण्यात आले. त्यानुसार रुग्णाने आपल्या नातेवाईकांचे सोने बँकेत गहान ठेऊन सदरची रक्कम रोख स्वरुपात भरली. त्यानंतर त्यांना सांगण्यात आले की मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे पैसे आल्यानंतर आपणास आपली रक्कम परत करण्यात येईल.
डीस्चार्ज झाल्यापासून गेल्या महिनाभर रुग्णाने हॉस्पिटल मधे जाऊन वारंवार चौकशी केली असता त्यांना हॉस्पिटल कडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. त्यांनतर शेवटी हतबल होऊन सदर रुग्णांनी हॉस्पिटलच्या मानसिक त्रासाला कंटाळून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी योगेश नाना पाटील व जयेश वासुदेव ढिकले यांच्याकडे मदतीची मागणी केली. सदर मनसेचे पदाधिकारी यांनी हॉस्पिटल कडे चौकशी केली असताना आमच्या पदाधिकाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तदनंतर आमचे पदाधिकारी दि.१३/०३/२०२४ रोजी मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष, मंत्रालय ०७ वा मजला, मुंबई येथे समक्ष जाऊन चौकशी केली असता असे लक्षात आले की मा. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत दि.०५/०२/२०२४ रोजीच रुग्णाच्या नावे हॉस्पिटलच्या कॅनरा बँक खाते क्रमांक.६०९९२०१००००३० मध्ये रु.१०००००/- (एक लाख रुपये) वर्ग करण्यात आले होते. सदर कार्यालयातून तसे UTR मंजुरीचे पत्र आमच्या पदाधिकाऱ्यांनी घेतले. त्यानंतर दि.१४/०३/२०२४ रोजी रुग्णालयात समक्ष जाऊन जाब विचारला असता त्यांनी सदर UTR मंजुरीचे पत्र ताब्यात घेतले व रुग्णा सोबत बोलून व्यवहार पूर्ण करून घेऊ असे सांगितले. UTR मंजुरीचे पत्र ताब्यात दिल्यानंतरही रुग्णास ०४ ते ०५ दिवस फेऱ्या मारायला लावल्या. तदनंतर रुग्णास दि.२१/०३/२०२४ रोजी हॉस्पिटलला बोलावून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे रु.१०००००/- (रुपये एक लाख) यातून रु.१००००/- (रुपये दहा हजार) टीडीएस, रु.२५०००/-(रुपये पंचवीस हजार) आमच्या एजंटची फी, रु.५०००/- (रुपये पाच हजार) असे एकुण रु.४००००/- (रुपये चाळीस हजार) असे वरतूनच वजा होऊन आले आहेत असे रुग्णास सांगण्यात आले. पुन्हा रुग्ण आमच्याकडे मदतीस आले असता आम्ही पुन्हा मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षात चौकशी केली असता असे कुठल्याही प्रकारचे चार्जेस व टीडीएस कापण्यात येत नाही अशी माहिती मिळाली. त्यानंतर हॉस्पिटलच्या विरोधात आमच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक.२२/०३/२०२४ रोजी मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य व मा.जिल्हा शल्य चिकित्सक, नाशिक तसेच आचारसंहिता असल्याने मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली व सखोल चौकशीची मागणी केली. तसेच संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कुठलेही सहकार्य करण्यात आले नाही. तदनंतर दिनांक.२७/०३/२०२४ रोजी आमचा पदाधिकारी योगेश नाना पाटील याच्या जत्रा हॉटेल या निवासस्थानाच्या परिसरात जाऊन श्री. सेवा हॉस्पिटलचे संचालक डॉ. विश्वनाथ पाटील, संजीवनी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विशाल जाधव, सहारा हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास अपसुंदे, डॉ. सचिन बिरारी यांनी आमचा पदाधिकारी योगेश नाना पाटील याला राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करून तुमच्यावर खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करू असे धमकवण्यात आले. यासंदर्भात त्याच दिवशी ओझर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन NCR नोंद केली व झालेल्या सर्व प्रकाराची व हॉस्पिटलच्या सर्व
भ्रष्टाचाराची संपूर्ण माहिती माननीय पोलिस निरीक्षक अरुण धनवडे साहेब यांना दिली. त्यांनतर याप्रकरणाची ओझर पोलीस प्रशासन आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी अथवा दखल घेण्यात आलेली नाही. सामान्य माणसाला न्याय मिळावा या प्रामाणिक हेतूने हॉस्पिटलच्या चौकशीचा पाठपुरावा आमच्या पदाधिकाऱ्यांनी सुरु ठेवला याचे स्मरण पत्र दिनांक.०९/०५/२०२४ रोजी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नाशिक विभाग, जिल्हा शल्य. चिकित्सक, जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिले. त्यानंतर ही सतत पाठपुरावा सुरु होता. यासंदर्भात दिनांक.२४/०५/२०२४ रोजी जिल्हा रुग्णालय नाशिक येथे अभिप्राय हि नोंदविला आहे. इतके सर्व करूनही सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही. प्रशासन कुठल्याही प्रकारचे सहकार्य करत नाही. असे लक्षात आल्यावर आमच्या पदाधिकाऱ्यांनी सदर प्रकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडला. लोकशाही मार्गाने सामान्य माणसाला न्याय मिळावा या प्रामाणिक हेतूने कायद्याच्या चौकटीत राहून धरणे आंदोलन करण्याचे ठरवले. त्याची रीतसर परवानगी अर्ज मा. जिल्हाधिकारी, मा.पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्याकडे करण्यात आला. तसेच ओझर पोलीस स्टेशन येथे परवानगी अर्ज करण्यासाठी आमचे पदाधिकारी गेले असता त्यांचा मानसिक छळ करण्यात आला. त्यांना ०४-०५ तास बसवून ठेवण्यात आले व त्याला परवानगी देण्यास टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदरहू आमच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस स्टेशन मध्ये वेगळ्या कॅबीन मध्ये नेऊन सदरच्या पोलिस निरीक्षक अरुण धनवडे साहेब यांनी हॉस्पिटलच्या डॉक्टर समोर आमिष देण्याचा प्रयत्न केला व अरेरावी तसेच खालच्या भाषेत शिवीगाळ करण्यात आली. सदर हा विषय सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी निगडीत असून या विषयामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे. असे असूनही सदर हॉस्पिटलला आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन पाठीशी घालत आहे. हॉस्पिटल प्रशासनाने दिलेल्या FIR मध्ये रु.२५००००/-(रुपये दोन लाख पन्नास हजार) चे एस्टिमेट सांगितले आहे, मग हॉस्पिटल प्रशासनाने दि.२९/०१/२०२४ रोजी रु.४,५०,०००/-( रु.चार लाख पन्नास हजार ) चे एस्टिमेट पत्र कसे दिले. म्हणजे इतर कुठल्याही योजनेद्वारे पण हॉस्पिटलला पैसे आलेत का याची हि चौकशी झाली पाहिजे. FIR मध्ये ऑडीओ रेकॉर्डिंगचा उल्लेख करण्यात आला ती ऑडीओ रेकॉर्डिंग छेडछाड करून प्रस्तुत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे आलेल्या रु.१०००००/- (एक लाख रुपये) यातून जो टीडीएस व इतर चार्जेस विचारणा केली असता स्वतः डॉ. विश्वनाथ पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून आजपर्यंत आम्ही एकुण १५ फाईल केल्या आहेत. म्हणजेच १५ फाईलचे प्रति फाईल रु.४००००/- (रु.चाळीस हजार) प्रमाणे रु.६०००००/- (रु.सहा लाख ) रुग्णांना परत करावे हि मागणी आम्ही चर्चे दरम्यान केली होती परंतु सदर प्रकरणात गोवण्याचा हेतूने ऑडीओ रेकॉर्डिंग करण्यात आली व त्यात छेडछाड करून सादर करण्यात आली आहे. सदर या विषयावर आवाज उठवल्यामुळे आमच्या पदाधिकाऱ्यांवरती हेतुपुरस्कर व द्वेषाने पैशाच्या जोरावर तसेच प्रशासनाला हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल करून हॉस्पिटल प्रशासन आपले स्वतःचे पाप लपवत आहे व खोट्या माहिती तसेच खोट्या बातम्या लाऊन हेतुपुरस्कर आमच्या पदाधिकाऱ्यांची व पक्षाची बदनामी करत आहे मा. जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब सदर विषय हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून या भ्रष्टाचारामध्ये संपूर्ण हॉस्पिटल प्रशासन सहभागी आहे. सदर प्रकार आरोग्य विभागाच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे. घटनेची खरी पार्श्वभूमी माहिती असताना ही ओझर पोलीस स्टेशनचे पी.आय अरुण धनवडे साहेब यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल करून घेतला. सदर पी.आय अरुण धनवडे साहेब यांची ताबडतोब कार्यालयीन चौकशी करण्याचे आदेश द्यावेत. अन्यथा सदर घटनेची निष्पक्ष चौकशी होणार नाही आणि पिडीताना न्याय मिळणार नाही. म्हणून सदरच्या FIR चा तपास ओझर पोलीस स्टेशन मधून मा.अधिक्षक साहेबांनी तातडीने स्वतःकडे वर्ग करावा व याची सखोल चौकशी करण्यात यावी व पिडीताना न्याय मिळून द्यावा. तसेच हॉस्पिटल प्रशासन या विषयाला हेतुपुरस्कर वेगळे वळण देत असून सदरहू आमच्या पदाधिकाऱ्यांवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे व पक्षाची बदनामी क्ररण्यात आली आहे. त्यामुळे आपण स्वतः सदर प्रकरणाची सखोल पारदर्शक चौकशी करावी ही विनंती. सोबत–सर्व वेळोवेळी दाखले देण्यात आलेल्या पत्रांची प्रत जोडण्यात आली आहे.
याप्रसंगी नासिक लोकसभा संघटक किशोर शिंदे, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, सलीम मामा शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर, योगेश शेवरे, महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष/सुजाता डेरे, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, संतोष सहाने, रमेश खांडमाले, खंडेराव मेढे, बंटी कोरडे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, धीरज भोसले, बंटी लबडे, योगेश दाभाडे, विधानसभा निरीक्षक प्रमोद साखरे, उपशहर अध्यक्ष सचिन सिन्हा, विनायक पगारे, भाऊसाहेब ठाकरे, संतोष कोरडे, प्रसाद सानप, मिलिंद कांबळे, संजय मोरे, दत्ता पवार, तुषार गांगुर्डे, शैलेश शेलार, अतुल पाटील, गणेश मोरे, ललित वाघ, प्रफुल बनवेरू, मेघराज नवले, सौरभ खैरनार, संदीप चौधरी, महिला सेना जिल्हा अध्यक्ष ज्योती शिंदे, वैशाली सोनवणे, कामिनी दोंदे, पद्मिनी वारे, स्वागता उपासने, अक्षराताई घोडके, मीरा आवारे, गौरी सिन्नरकर, अस्मिता काजळे, दर्शन बोरसे, राजेश तापकिरे, केशव वाघ, ज्ञानेश्वर बगडे, व आधी पदाधिकारी उपस्थित होते.