टपरी, पथारी, हातगाडी, फेरीवाले यांचेवर होणारी सततची अतिक्रमण कारवाई त्वरित थांबवा..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ जून २०२४ पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या आठ ही क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत टपरी पथारी हातगाडी फेरीवाले यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण होऊन व्यवसाय परवाना देणे कामे तयार करण्यात आलेली प्राथमिक यादीत नाव समाविष्ट असून देखिल व ज्यांच्याकडे जुने व्यवसाय परवाने देखिल आहेत अशा सर्व व्यावसायिकांवर महापालिकेच्या वतीने पर्यायी व्यवस्था अथवा पर्यायी हॉकर झोन तयार नसताना जी अतिक्रमणची कारवाई होत आहे ती त्वरित थांबवावी या करिता मराठवाडा विकास सामाजिक संघटनेच्या वतिने पालकमंत्री अजितदादा पवार व सहाय्यक आयुक्त भूमी आणि जिंदगी विभाग पिंपरी चिंचवड मनपा तसेच ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे नमूद केले आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे असणारे सन्माननीय आयुक्त साहेब यांचे आदेशाने महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागाने सन २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व ८ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असणारे टपरी पथारी हातगाडी फेरीवाले यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केलेले आहे. सदर सर्वेक्षणामध्ये काही टपरी पथारी हातगाडी फेरीवाले व्यावसायिक पात्र झालेल्या असून त्यांचे कागदपत्राची पूर्तता सुद्धा करून घेण्यात आलेली आहे. व या कामे तयार करण्यात आलेली प्राथमिक यादी टपरी पथारी हातगाडी फेरीवाले यांच्या पाहणी करिता प्रत्येक क्षत्रिय कार्यालयाच्या भूमी आणि जिंदगी विभागांमध्ये ठेवण्यात आलेली होती व टपरी पथारी हातगाडी फेरीवाले यांना आवाहन करण्यात आले होते की जर आपले बायोमेट्रिक सर्वेक्षण होऊन सुद्धा जर आपण अपात्र असाल तर एक वर्ष कालावधीच्या आतमध्ये सदर अपात्रतेची पात्र होने कामी पूर्तता करणे करिता कागदपत्रे क्षेत्रीय कार्यालयानुसार कार्यालयात जमा करायचे आहेत काही नागरिकांनी ते कागदपत्रे सुद्धा व्यवसाय परवाना मिळणे कामी जमा केलेले आहेत तरी बायोमेट्रिक सर्वेक्षण होऊन एक वर्ष कालावधी लोटला गेला तरीही आजतागायत. हॉकर झोन तयार करण्यात आलेले नाही महानगरपालिकेच्या वतीने ज्या ज्या लोकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण झालेले आहे अथवा ज्या लोकांकडे जुने व्यवसाय परवाने आहेत. व काही अपंग टपरी पथारी हातगाडी व्यवसाय आहे अशांना सुद्धा अतिक्रमण कारवाईला सामोरे जावे लागत आहे तरी मेहरबान आयुक्त साहेब आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की आपण कोट्यावधी रुपये खर्च करून शहरातील टपरी पथारी हातगाडी फेरीवाले व्यवसायिकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केलेले आहे. परंतु व्यवसायासाठी योग्य जागा अथवा हॉकर झोन तयार करण्यात आलेले नसून तरीसुद्धा आपणाकडून अतिक्रमण कारवाई अगदी म्हणजे अगदी हुकूमशाही पद्धतीने केली जात आहे सदर कारवाईला शोषित वंचित पीडित निराधार गरीब अल्प उत्पन्न गटातील नागरिक ज्यांना रोजगाराचे कुठले साधन नसल्यामुळे व्यवसाय करून व आपल्या कुटुंबाचे तसेच कुटुंबातील सदस्यांचे पालन पोषण शिक्षण असेल इत्यादी पूर्तता करत असतो परंतु त्यावरही अतिक्रमणाचा बुलडोझर महापालिकेकडून फिरवला जात आहे व यामध्ये अतिक्रमण कारवाईच्या वेळेस नेमण्यात आलेले महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी अगदी कायदा हातात घेऊन या शहरांमध्ये गोरगरिबांवर दहशत निर्माण करण्याच्या तयारीत आहे व लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीने त्यांच्याकडून वर्तन होत आहे नुकतेच महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्या कर्मचाऱ्यांनी दापोडी येथील महिलेला केलेली मारहाण तसेच “क” प्रभाग कार्यालयांतर्गत झालेल्या अतिक्रमण कारवाईच्या वेळी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे महिला कर्मचारी यांनी अक्षरशः हातगाडी धारक महिला यांचे डोक्याचे केसाला धरून तिचे गाडीवरील सर्व भाजीपाला फेकून देतानाचा व्हिडिओ सध्या फेसबुक वरून व्हायरल होत आहे तरी मेहरबान साहेब हे कुठेतरी लोकशाहीला मारक असं वर्तन असून जर जनतेचा रोष अनावर झाला तर नक्कीच या हुकूमशाहीला आवर घातल्याशिवाय जनता राहणार नाही आम्ही संस्थेच्या माध्यमातून असे आपणास जाहीर आवाहन करतो की पहिले सर्व सर्वेक्षण झालेल्या टपरी पथारी हातगाडी व्यावसायिक लाभधारकांना पर्यायी जागा अथवा हाॅकर झोन देत नाही तोपर्यंत कारवाई करण्यात येऊ नये. आपणास आमचे निवेदन प्राप्त झाल्याच्या दिवसा पासून आपण लगेचच हॅकर झोनची जागा निश्चित करणे, जागा पाहणी करणे, प्राथमिक यादीमध्ये ज्या ज्या व्यवसायिकाचे नाव आले आहे त्या त्या व्यवसायिकाला व्यवसाय परवाने देणे इत्यादी कामे आपण तात्काळ जलद गतीने पावले उचलावीत १५ पंधरा दिवसाच्या आत लेखी कळवावे अन्यथा महानगरपालिकेसमोर आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असे मराठवाडा विकास सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर कांबळे यांनी सांगीतले यावेळी फेरीवाला धोरण समितीचे सदस्य प्रवीण कांबळे, विष्णू सरपते , राजन नायर, रमेश गायकवाड, रमेश बोर्डे शेषराव दुधमल, व्यंकटेश कुराडे पांडुरंग डोंगरे उपस्थित होते.