आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका संशयास्पद- राज राजापूरकर

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ जून २०२४ राज्य सरकारमधील मंत्री तथा सरकारमधील नेत्यांच्या वतीने मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा विषय ज्याप्रमाणे हाताळत आहे. या संदर्भातील सरकारची भुमिका संशयास्पद आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पार्लमेंटरी बोर्ड सदस्य तथा ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर म्हणाले की, राज्यात एकीकडे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन सुरू होते. त्यांनतर आता ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून आंदोलन केले जात आहे. हे आदोलन सांभाळताना सत्तेतील लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यात सरकारची भुमिका महत्वाची आहे. सरकारने नोंदी शोधल्या, प्रमाणपत्र दिले. पण मला यात संशय येतो आहे. ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी सरकारची भुमिका संशयास्पद आहे. कारण ते जातनिहाय जनगणना करत नाही. जातनिहाय जनगणना संदर्भात आम्ही वारंवार भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र सरकारच्या वतीने जातनिहाय जनगणना करण्यावर सरकारकडून कुठलीही भूमिका स्पष्ट करण्यात येत नाही आहे. आम्ही जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून आंदोलन करणार आहोत. जातीनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आम्ही राज्यात ठीक ठिकाणी आंदोलन करणार आहे. तसेच अधिवेशना दरम्यान राज्य सरकारला विधानसभेवर जाऊन घेरावा देखील घालण्यात येईल. ओबीसी आमचा डीएनए आहे असे म्हणणाऱ्या फडणवीस यांच्या वक्तव्याचा ओबीसी सेलच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. कारण जेंव्हा ओबीसी आरक्षणाविषयी भुमिका घेण्याचा मुद्दा येतो तेंव्हा ते बोलत नाहीत. आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस नेहमीच वेळेनुसार वेगवेगळे वक्तव्य करत असतात. ओबीसी सेलच्या वतीने आम्ही देवेंद्र फडणवीस यांना अधिवेशनादरम्यान घेराव घालणार आहे असे राज राजापूरकर यांनी सांगितले आहे.
काल झालेल्या बैठकीचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस सचिन गायकवाड यांनी केले. पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ, ओबीसी विभाग शहराध्यक्ष विशाल जाधव, उपाध्यक्ष सागर भुजबळ, विधानसभा अध्यक्ष संतोष माळी, बिरुदेव मोटे, किरण ठोंबरे, अनिल भोसले, विवेक विधाते, आदी उपस्थित होते.




