रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र सचिव मा. रमेश चिमूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणा सह विविध कार्यक्रम..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ जूलै २०२४ रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र सचिव मा. रमेश चिमूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या (भिमसृष्टी) पुतळ्या शेजारी माता रमाईच्या नियोजित स्मारक परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वृक्षारोपण मा. रमेश चिमूरकर यांच्या हस्ते तसेच पक्षाचे पदाधिकारी मा. लिंबराज कांबळे, भारतजी बनसोडे, विक्रम कांबळे, विजयजी ओव्हाळ, जितेंद्र बोरकर, राहुल जाधव, राजन नायर, महेबूब भाई उमेश चिमूरकर, जयेश चिमूरकर, मोरे, महायान मसुरे, एच. आर. शहा असे अनेक क्षेत्रातील नेते कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री. राजन नायर यांनी पूष्पगूच्छ देवून वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या.
सायंकाळी वाढदिवसाचा केक कापण्यात आला यावेळी रिपाईचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच पिंपरी चिंचवडचे रिपाईचे अध्यक्ष स्वप्निल कांबळे व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अल्पउपहाराचा कार्यक्रम ही करण्यात आला. याच प्रमाणे पंचशिल बूद्धविहार संततूकाराम नगर येथे त्रिसरण पंचशिल वंदना गृहण करून वाढदिवसाचा केक कापण्यात आला. यावेळी बूद्ध विहारात अल्पउपहाराचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सांगता मा. रमेश चिमूरकर यांच्या वतीने उपस्थितांचे आभार मानून करण्यात आली.










