लोकनेते शहाजीराव पाटील विद्यालयातील ६०० विद्यार्थी ॲग्रीक्रॉस फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण करून धरतीवर चढवणार हिरवी शाल..
प्रतिनिधी इंदापूर दि. ०२ जूलै २०२४ दोन दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांची पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
“वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरें; पक्षी ही सुस्वरें आळविती ||” हा तुकारामांचा वृक्षांप्रती असणारा कृतज्ञतेचा भाव अभंगातून लक्षात येतो.
महाराष्ट्र राज्याचे सलग १२ वर्षे मुख्यमंत्री पद भुषवणारे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात येते. या कृषी दिनाचे औचित्य साधून बोराटवाडी विद्यालयातील ६०० विद्यार्थी अग्रिकॉस फाउंडेशनच्या माध्यमातून करणार वृक्षारोपण.
या फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत १२००० रोपांची लागवड करण्यात आली अशी माहिती फाउंडेशनचे सदस्य ताहेर मुलानी यांनी दिली. यावेळी फाउंडेशनचे सदस्य श्री. किशोर घोगरे, श्री. सुरज शेटे, श्री. महेश कोळेकर, श्री. किशोर चव्हाण, श्री. जितेंद्र साळुंखे, श्री. निखिल राऊत, श्रीगणेश खताळ, विद्यालयाचे प्राचार्य श्री. भिमराव आवारे सर यांच्या उपस्थितीत ६०० विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.
सध्या वातावरणात, ऋतू मध्ये होणारा बदल वृक्षतोडीमुळे झाला आहे. म्हणून वृक्षारोपण ही काळाची गरज आहे असे विचार श्री. निलाखे सर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमर निलाखे सर यांनी तर आभार श्री. भिमराव खाडे सर यांनी मानले.