महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड भाजपाला राष्ट्रवादीचा दे धक्का.. भाजपचे मोठं नेतृत्व राष्ट्रवादीच्या वाटेवर..

विषेश प्रतिनिधी चिंचवड पिंपरी चिंचवड शहरातील खंबीर नेतृत्व मनोज तोरडमल प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भारतीय जनता पार्टीचे तब्बल तीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत असणारे मातंग समाजाचे खंबीर नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
गेली १४ वर्षापासून वाल्हेकरवाडी परिसरामध्ये कार्यरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी करत असतात आणि आंबेडकर चळवळीशी देखील त्यांची नाळ आहे, भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत असताना त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये संघटन बांधणी करून पक्ष बांधणी केलेली आहे.
अचानक प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा भाजप मनोज तोरडमल हे राष्ट्रवादी मध्ये जाणार असल्याचे चर्चा ऐकायला मिळत आहे. तोरडमल सारखं नेतृत्व अचानक भाजप सोडून राष्ट्रवादीच्या वाटेवर जात असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर शहरांमध्ये एक वेगळेच वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या नंतर भाजपमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र मातंग समाजाचे नेतृत्व म्हणून मनोज तोरडमल यांच्या कडे पाहिले जाते तेच नेतृत्व अचानक भाजपमधून बाहेर का पडत आहे आणि का राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे हे देखील कळायला तयार नाही.
मनोज तोरडमल यांच्याशी फोन वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फ़ोन स्विच ऑफ असल्याचे दिसून आले आहे. त्या नंतर मनोज तोरडमल यांच्या अत्यंत जवळचे सहकारी मित्र त्यांच्या कडून माहिती मिळाले आहे की मनोजभाऊ राष्ट्रवादी मध्ये प्रेवेश करणार आहे त्यामुळे ही बातमी तिथे अगदी खरी ठरते आहे.
मनोज तोरडमल भाजपमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना मानणारा वर्ग देखील भाजप मधून बाहेर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे सूत्रांकडून समजते. तोरडमल खरच भाजप सोडून राष्ट्रवादी मध्ये जातील का? की भाजप त्यांना समजवण्यात यशस्वि ठरेल हे तर वेळच ठरवेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!