प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०५ जूलै २०२४ ॲडव्हेंचर मार्शल आर्ट स्कूल यांचा १५ वा वर्धापन दिन चिंचवड इथे जल्लोषात साजराकरण्यात आला. (गोड पदार्थ वाटण्यात आले) कार्यक्रमात बेल्ट व पदवी प्रमाणपत्र देऊन विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
१०वी मधे उत्तीर्ण विद्यार्थी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
पंच परीक्षा प्रमाणपत्र देऊन तसेच राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त खेळाडू यांना गौरविण्यात आले.(अगदी ०४ वर्ष वय) लहान वयातच मुलींना मार्शल आर्ट कला मधे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व पालक यांचा सत्कार करण्यात आला. गोवा इथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धे करीता शुभेछा देण्यात आल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. दत्तात्रय चिंचवडे, अध्यक्ष महा. राज्य. ज्ञानेश्वरी सेवा समिती, श्री.निवृत्ती काळभोर, अध्यक्ष पिंपरी चिंचवड माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरीक शिक्षण शिक्षक महामंडळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. उमेश लोंढे (वी नाईक , पुणे) तथा मुख्यप्रशिक्षक होते.
यांच्या हस्ते बेल्ट, पदवी प्रमाणपत्र चे वितरण करण्यात आले. यावेळी ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक यांचे सत्कार करण्यात आले यामधे सेंपाई शिवराज चिंचवडे, सेंपाई समर्थ म्हेत्रे, सेंपाई स्वराज सनाईक, सेंपाई मनोज दुधवडे, सेंपाई साईराज नीचीते व सेंपाई उमा काळे.
कार्यक्रमाचे आयोजक सेंपाई-चैतन्य पोळ , शाखा प्रशिक्षक चिंचवड कार्यक्रम भोलेश्वर सेवा समिती सभागृह चिंचवड पुणे. येथे काल दि. ०४ जूलै २०२४ रोजी सायं. ०८ वा. संपंन्न झाला.