ज्येष्ठ समाजसेवक मा. श्री. आझम खान यांनी बांधकाम कामगारांच्या कुटुंबासाठी मोफत ३० प्रकारची भांडी गृहपयोगी वस्तु संच आणि सुरक्षा संच पेटी वाटप करण्यात आले.
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०५ जूलै २०२४ इमारत बांधकाम व्यवसायात काम करणा-या बांधकाम कामगारांना संबंधित आस्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नविन बांधकाम जेथे सुरु होते तेथे स्थलांतरीत व्हावे लागते, अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवारा, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागते.
त्यांना दैनंदिन भोजन तयार करण्यास सहाय्य व्हावे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक आझम खान यांनी महाराष्ट्र इमारत व इतर बाधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, पुणे यांनी दिनांक ०४ जूलै २०२४ रोजीच्या नोंदीत सक्रिय बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तु संच वितरण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी शिवश्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष सतीश भांडेकर, कार्याध्यक्ष दत्ता भांडेकर आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष विनोद क्षीरसागर हे उपस्थित होते.